जबलपूरमधील अपघातात गोंदिया जिल्ह्यातील 11 जणांचा मृत्यू,15 जखमी

0
10

गोंदिया/जबलपूर,दि.11(berartimes.com)-गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव(डव्वा),बोथली व घाटबोरी तेली येथील 20 ते  26 व्यक्ती हे तेंदुपत्ता तोडण्यासाठी आपल्या गावावरुन जबलपूरला पोचले होते.ते गोंदियावरुन जबलपूरला रात्रीला रेल्वेने पोचले.तेथून वनविभागाच्या गाडीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी चरगंवा येथे जाण्यासाठी निघाले असता वाहनचालकाचे पिकअप वाहनावरील नियत्रंण सुटल्याने पुलाचे रेंलिंग तोडत पुलाखाली नदीत वाहन कोसळले.याघटनेत 11 व्यक्तींची मृत्यू झाली.तर 15 व्यक्ती हे जखमी झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री 2 वाजेच्या सुमारास जबलपूर येथील जमुनिया जवळ घडली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्वरीत पोलीसांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना जबलपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.उपचरानंतर 11 जखमींना डिस्चार्ज करण्यात आले असून 4 गंभीर जखमीवर अद्यापही उपचार सुरु आहे.घटनास्थलावर 10 जणांचा तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.पोलीसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने ज्या तेंदुपत्ता कंत्राटदाराला वाहन दिले होते.त्या कंत्राटदाराचा वाहनचालक हा दारुच्या नशेत वाहन चालवित होता.या दरम्यान  नरसिंहपुर-गोटेगांव मार्गावरील जामुनिया जवळील एका वळणरस्त्यावर ड्राइवरचे गाड़ीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पुलाचे रेलिंग तोड़त सरळ खाली पडले.या घटनेत घटनास्थळावर 10 मजुरांचा मृत्यू झाला.मृतक व जखमींच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मध्यप्रदेश सरकारच्यावतीने देण्यात आले असून घटनेनंतर गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीसांना घटनेची माहिती त्वरीत कळविण्यात आली.

मृतकामध्ये –1- बुधराम पिता लक्खू (40),2- चुन्नीलाल  दायाराम चौधरी (35),3- लच्छू कुंवरलाल चौधरी (30),4- रामनाथ  गनपत सरोते (40),5- तुलाराम  हरिशचंद्र मोयरे (35),6- प्रदीप  माऊराव हल्वी (19),7- छगन नीलकंठ कामड़े (30),8- शंकर रामकृष्‍ण मसकोडे़ (35),9- गनेंद्र तेजराम (35),10- टुमेश्वर दयाराम भोयर (40 रा.बोथली),11- संतू  दामा शेंडे (53,रा.बोथली) यांचा समावेश आहे. जखमी मध्ये -बाबुराव चितांमन मेश्राम,नरेश नेतराम भोयर,हरिचंद्र रमेश भोयर,कोंडू गजभिये सर्व बोथली,

 

 

जखमी मध्ये- 1 – बाबूराव चिंतामण मेश्राम (55,रा.बोथली),2- नरेश नेतराम भोयर (24 रा.बोथली),3- विलास नामदेव हल्वी (29), भुनेश्वर पिता रामदास सोनवाने (45),5- भाऊराव पिता सदाराम हल्वी (45)6- जयपाल पिता श्रीराम हल्वी( 55),7- रविंद्र पिता तेजराम हल्वी (25),8- भोजराज पिता चिंतामण हल्वी (40),9- हरिचंद्र रमेश य(22),10- काली राम पिता चेम्पू चकटे (40),11- हुलीचंद्र पिता दसरू कोलारे (35),12- देवाजी पिता कारू मोयर (50),13- मारूती पिता अर्जुन कोयरे (40),14- चुन्नीलाल  लक्ष्मण सिंडे (32),15- त्रिमूति पिता अमितन बंसोर (28), यांचा समावेश आहे.मृतकात सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव येथील 6,बोथील येथील 2 व इतर ठिकाणीचे 3 जणांचा समावेश असून त्यांच्यावर त्यांच्यागावी सामुहिक अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु करण्यात आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर व इतर सहकारी जखमी व मृतकांच्या कुटुंबाना सर्वतोपरी मदत मिळावी.तसेच ज्या तेंदुपत्ता कंत्राटदाराने त्यांना पाठविले होते,त्यांनी आर्थिक मदत तत्काळ करावी अशी मागणी केली आहे.