काँग्रेस नेते चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने मारला छापा

0
14
नवी दिल्ली, दि. 16(वृत्तसंस्था) – माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्थी चिदंबरम यांच्या निवासस्थानांवर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापे मारले. मागच्या महिन्यात कार्थी चिदंबरम आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीला कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कार्थी चिदंबरमशी संबंधित असलेल्या या कंपनीवर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
एअरसेल-मॅक्सिस आर्थिक व्यवहार प्रकरणी सुद्धा त्याची चौकशी सुरु आहे. अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांचे संचालक आणि कार्थी चिदंबरमला ईडीने कारणेदाखवा नोटीस बजावली होती. एअरसेल-मॅक्सिस करारात आर्थिक गैरव्यवहार असल्याचे आरोप झाल्यानंतर . अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ईडीच्या रडारवर आली.
मागची तीन वर्ष तुम्ही काय करत होता ?. तुमच्याकडे पुरावे असतील तर सिद्ध करा. तुम्ही प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहात. भारतातील जनता हे सर्व बघत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडाक्कन यांनी या छाप्यांवर दिली.