गोंदिया जिल्ह्यातील सोनपूरी भागात आढळली नक्षल्यांची पत्रके

0
8

गोंदिया,दि.२०-गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा या नक्षलग्रस्त तालुक्यातील सोनपूरी गावानजीक आज सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी तीन चार प्रकारची पत्रके लावून पुन्हा सक्रीयता दाखविली आहे. छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील भुसुरंगस्पोट हे शौर्याचे प्रतिक असल्याचा उल्लेख करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री राजनाथqसह व छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विकासाच्या पाखंडचा पर्दापाश असल्याचा उल्लेख केला आहे.मिळालेल्या पत्रकावर जनमुक्ती छापामार सेना(पीएलजीए)च्या बहादुर विर योद्यांना क्रांतिकारी अभिनंदन असा उल्लेख सकल शोषित जनमंच,छत्तीसगड असा उल्लेख आहे.सदर पत्रके आढळल्याची माहिती सालेकसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक खंदारे यांनी दिली आहे.