नाम संस्थेमार्फत कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पत्नीला मदतीचा हात

0
14

अमरावती,दि.20- जिल्ह्यातील कठोर बु.येथील युवा शेतकर्याने कर्जामुळे आत्महत्या केल्याने अडचणीत सापडलेल्या या शेतकर्याच्या कुटुंबाला नाम संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या पुढाकाराने 15 हजार रुपयाचा धनादेश देऊन मदतीचा हात देण्यात आला.या मदतीचा धनादेश अमरावतीचे तहसिलदारामार्फेत देण्यात आले. कठोर बु येथील युवा शेतकरी अमोल शंकरराव उमेकर(40) यांनी रानडुकांनी उध्वस्त केलेल्या पिकासोबतच कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे या तरुण शेतकर्याचे कुटुंब अडचणीत आले होते.याची दखल जि. प. सदस्य प्रकाश साबळे यांनी घेत शासकीय पातळीवर मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने नाम संस्थेचे जिल्हा समन्वयक वासुदेव जोशी यांची भेट घेऊन माहिती दिली.त्याची त्वरित दखल घेऊन उमेकर यांच्या कुटुंबाला १५ हजार रुपयाची मदत केली.यावेळी गावाचे माजी सरपंच भाष्कर कालबांडे ,भागवतराव खांडे, विनोद भालेराव, सुजित खांडे, सतीश महल्ले, शैलेश कालबांडे, किरण महल्ले, सागर ठाकरे यांनी सहकार्य केले.