प्रशासनाच्या त्रासाला कटांळून शेतकèयांचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
10

गोंदिया,दि.२०-गोरेगाव तालुक्यातील बघोली ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या पांदण रस्ता बांधकामात रस्त्यालगतच्या शेतकèयांची दिशाभूल करुन पांदन रस्ता तयार करण्यात आल्याची तक्रार शेतकरी रुपचंद पटले,नारायण चन्ने व इतरांनी केली होती.त्या तक्रारीच्या आधारे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार कारवाई न झाल्याचा मुद्दा समोर करीत आज शनिवारला बघोली येथील शेतकरी रुपचंद पटले,नारायण चन्ने व इतर तीन ते चार जणांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून व विषप्राशन करुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली.सबंधित शेतकरी अशा प्रकार करण्याची शक्यता पोलीसांना कळताच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेत  या सर्व शेतकèयांना पोलीसांनी ताब्यात घेतले.त्यांनतर जिल्हा परिषदेचे सभापती पी.जी.कटरे यांना माहिती मिळताच त्यांनी त्या शेतकèयांकडे धाव घेतली.संबधित शेतकरी यांचे म्हणने एैकुन निवासी उपजिल्हाधिकारी,मग्रारोहयो उपजिल्हाधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांना बोलावून चर्चा घडवून आणली.तेव्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी १९ मे रोजीच याप्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यासोबतच २६ मे रोजीच्या ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाला हटविण्याबाबत ठराव घेण्याच्या सुचना तसेच त्याचावर पोलीस कारवाई करण्यासंबधी गटविकास अधिकारी,पंचायत समिती गोरेगाव यांना निर्देश दिले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांनी सांगितल्यानंतर आंत्मदहन करणारे आंदोलक शेतकरी शांत झाले.सभापती कटरे यांनी यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच.ठाकरे यांच्यासोबत सबंधित शेतकरी यांची बैठक घेऊन गोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीसह ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकाची चौकशी करण्यासंबधात चर्चा केली.यावेळी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे,उपमुकाअ राजेश बागळे,श्री भेंडारकर आदी उपस्थित होते.