नक्षल्यांनी जाळली यात्री बस

0
8

नारायरणपूर,दि.30-छतीसगड राज्यातील झारगाव ते ओरक्षाचच्या दरम्यान रात्रीला 10 वाजेच्या सुमारास एका खासगी प्रवासीबसला नक्षल्यानी आग लावून रस्ता बांधकामाचा निषेध नोंदविल्याची घटना उघडकीस आली आहे.धानोरापासून 4 किलोमीटरवरील दक्षिण भागातील झारगाव ते ओरक्षा च्या दरम्यान प्रवासी बस चालली होती.त्या बसला थांबवून प्रवासाना उतरवून बस जाळली.नक्षली अबुझमाड -नारायणपूर ते ओरक्षा सडक बांधकाम कार्याचा विरोध करीत आहेत.त्यांच्या विरोधाला झुगारून आईटिबीपी व पोलीसांच्या सुरक्षेत रस्ता बांधकाम सुरु आहे.66 किमीपैकी 45 किमीचा रस्ता पुर्ण झालेला अाहे.या घटनेची पुष्टी नारायणपूरचे एसपी संतोष सिंग यांनी केली आहे.