रेल्वे रुळावर सापडला IAS अधिका-याचा मृतदेह

0
17

पाटणा,दि.11(वृत्तसंस्था) – बिहारमधील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी गाझियाबादमधील रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुकेश पांडे असे मृत अधिका-याचे नाव असून ते बिहारच्या बक्सरमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी पदावर कार्यरत होते. गुरुवारी रात्री रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली आहे.
गाझियाबाद रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. मुकेश पांडे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. मला आयुष्याचा कंटाळा आला आहे, मला माफ करा, मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहीले होते. मुकेश पांडे दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील रुम नंबर 742 मध्ये उतरले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.