24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून १२ नागरिकांचे अपहरण

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडून १२ नागरिकांचे अपहरण

0
22

रायपूर, दि. २४ – छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी १२ नागरिकांचे अपहरण केले आहे. दंतेवाडाच्या परचेली येथे ही घटना घडली असून ग्राम पंचायत निवडणुकीला विरोध दर्शवण्यासाठी माओवाद्यांनी काल रात्री ग्रामस्थांचे अपहरण केले. त्यामध्ये सरपंचपदाच्या उमेदवाराचाही समावेश असून त्याची हत्या करण्यात आली आहे.

येत्या चार फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायत निवडणूक होणार असून त्यासाठी कोणीही उभे राहू नये अथवा मतदान करू नये यासाठी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.