24.8 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News बांदीपोरामध्ये लष्कराचे 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, IAF गार्ड शहीद

बांदीपोरामध्ये लष्कराचे 6 दहशतवाद्यांना कंठस्नान, IAF गार्ड शहीद

0
24

जम्मू(वृत्तसंस्था)दि.18- बांदीपोराच्या हाजीन परिसरात सेक्युरिटी फोर्सेसने 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. एन्काऊंटरदरम्यान एक IAF गार्ड शहीद झाला लआणि लष्कराचे दोन जवानही शहीद झाले. ही चकमक अजूनही सुरू आहे. याच आठवड्यात कुलगाममध्ये एन्काऊंटरमध्ये आर्मीने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. RTI च्या एका उत्तरात समोर आले आहे की, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत सिक्युरिटी फोर्सेसने 168 दहशतवाद्यांनी ठार केले आहे.
गेल्या मंगळवारी (14 नोव्हेंबर) ला नौबगकुंडमध्ये झालेल्या ऑपरेशनदरम्यान आर्मीने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. त्यादरम्यान एका जवानाला गोळी लागली होती. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.