3 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक नागरिकही ठार

0
5

श्रीनगर ,दि.11(वृत्तसंस्था)-जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सिक्युरिटी फोर्सेसने एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रविवारी रात्री उशीरा सुरू झालेली चकमक आता संपुष्टात आली आहे. ऑपरेशनदरम्यान एका नागरिकाचा मृत्यूही झाला आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद म्हणाले की, मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते. 5 डिसेंबरला साऊथ काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यात 2 पाकिस्तानचे नागरिक होते. तिन्ही दहशतवाद्यांवर जुलै महिन्यात अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप होता.