तोगडिया यांच्या भाषण प्रसारणावर बंदी

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बंगळूर – विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना बंगळूरमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यावर तोडगा शोधत आयोजकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रवीण तोगडियांचे भाषण सभेत दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पोलिसांनी हे भाषण शनिवारपासून पुढे दोन दिवस दूरचित्रवाहिनीवर प्रसारित करण्यास बंदी घातली आहे.

शहर पोलिस आयुक्त एम.एन. रेड्डी यांनी फौजदारी दंड संहितेतील कलम 144(3) अनुसार अधिकारांचा वापर करत विश्‍व हिंदू परिषदेला तोगडिया यांचे भाषण सात फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून नऊ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही दूरचित्रवाहिनीवर प्रसारित करण्यास बंदी केली आहे. यापूर्वी तोगडिया यांना बंगळूरमध्ये प्रवेश बंदी केल्यानंतर केशव हेगडे यांच्यासह अन्य आयोजकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तोगडिया यांचे भाषण सभेत आयोजित केले होते. त्यापूर्वी तोगडिया यांची बंगळूरमधील प्रवेश बंदीच्या पोलिस आयुक्तांच्या निर्णयावर स्थगितीची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. तोगडिया यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो असे रेड्डी यांनी म्हटले आहे