‘आपचा विजय अन मोदी, शहांना झटका?

0
10

दिल्ली- विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ‘आपङ्कचेअरविंद केजरीवाल यांच्या विरोधात त्यांच्या एकेकाळच्या सहकारी किरण बेदी यांना उतरवून टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. पण, भाजपचा हा त्यांचा डाव त्यांच्यावर उलटला असून, ‘आपङ्कने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या खेळीला चीतपट करीत दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली जबरदस्त यश मिळविणाèया भाजपला राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, हरियाना राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्यात यश मिळाले होते. दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेसाठी काही जागा कमी पडल्या होत्या आणि त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसच्या पाठिंब्यावर ४९ दिवस सरकार चालविणाèया अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. अखेर या वर्षात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर फेबुवारीमध्ये दिल्लीत निवडणुका झाल्या. सुमारे ६७ टक्के मतदान झाल्यानंतर दिल्लीकर ‘आपङ्कला बहुमत देणार असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविला होता. अखेर आज ‘आपङ्कने सर्वांचेच अंदाज चूक ठरवीत अनपेक्षित कामगिरी केली. ‘आपङ्कने ६४ हून अधिक जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला.तर काँग्रेसला मात्र भोपळा मिळाल्याने काँग्रेसमध्ये राहुल गांधी विरोधी सुर येऊ लागले आहेत.काँग्रेस नेते अजय माखन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.भाजपला 5 जागेवरच समाधान मानावे लागले.
देशभरात आत्तापर्यंत विजयरथ मिरविणाèया भाजपला ‘आपङ्कच्या या विजयाने लगाम लागल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतील भाजपमधील अंतर्गत बंडाळी त्यांच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे कारण दिले जात आहे. पण, आता विविध कारणे देण्यापेक्षा भाजपला आता या निकालातून बोध घेणे गरजेचे आहे.