हा नरेंद्र मोदींचा पराभव -अण्णा हजारे

0
3

पुणे-भाजपचा पराभव का झाला ?, कारण भाजपने विश्वासार्हता गमावलीये. त्यांनी लोकांना दिलेली आश्वासनं पाळली नाही म्हणून त्यांचा हा पराभव झालाय हा पराभव खरं तर नरेंद्र मोदींचा आहे अशी खरमरीत टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

तसंच अण्णांनी अरविंद केजरीवाल यांचं तोंडभरून कौतुक केलंय. केजरीवाल हा चांगला माणूस आहे. त्याला सरकार कसं चालवायचं हे माहित आहे असं सांगत अण्णांनी केजरीवाल यांचं अभिनंदन केलं. केजरीवाल यांनी आधी झालेल्या चुका टाळून साधेपणाने काम करावं. केजरीवाल यांनी आंदोलनाचा विसर पडू देऊ नये असा सल्लाही अण्णांनी दिला.

दुसरीकडे किरण बेदी यांचंही अण्णांनी सांत्वन केलं. किरण बेदी यांचा यात दोष नाही. राजकारण हे राजरकारण असतं. पण जनतेनं कौल दिलाय, जनसंसद हे सर्वोच्च आहे त्यांचा निर्णय मानला पाहिजे असंही अण्णा म्हणाले. केजरीवाल सरकारच्या शपथविधीला जाणार का असं विचारला असता केजरीवाल यांना आपल्या शुभेच्छा आहे पण आपण शपथविधीला जाणार नाही असं अण्णांनी स्पष्ट केलं.

अण्णांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

अरविंद बुद्धीमान, त्याला सरकार कसं चालवायचं हे माहित आहे – अण्णा हजारे
भाजपनं विश्वास गमावलाय – अण्णा हजारे
मी शपथविधीला जाणार नाही -अण्णा हजारे
मात्र माझ्या शुभेच्छा आहे -अण्णा हजारे
सर्व पक्षातल्या चांगल्या लोकांनी काम करावं – अण्णा हजारे
भाजपचा पराभव का झाला ?, भाजपची विश्वासार्हता गमावलीये-अण्णा हजारे
भाजपने आश्वासनांचं पालन केलं नाही -अण्णा हजारे
अरविंद केजरीवाल चांगला माणूस- अण्णा हजारे
आंदोलनाचा विसर पडू देऊ नका – अण्णा हजारे
केजरीवाल यांनी आधी झालेल्या चुका टाळाव्यात साधेपणानं काम करावं -अण्णा हजारे
किरण बेदी यांचा दोष नाही -अण्णा हजारे
जनतेनं कौल दिलाय,जनसंसद सर्वोच्च आहे – अण्णा हजारे