भूमध्य समुद्रात 200 स्थलांतरितांना जलसमाधी

0
24

रोम – भूमध्य समुद्रामध्ये नावा बुडाल्याने इटलीकडे निघालेल्या किमान 200 स्थलांतरितांचा मृत्य ओढविल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थलांतरितांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने आज (बुधवार) दिली. या दुदैवी घटनेमधून अवघ्या नऊ जणांन वाचविण्यात यश आले.
“समुद्रामध्ये चार दिवस काढल्यानंतर या नऊ जणांना वाचविण्यात यश आले. इतर 203 नागरिकांचा मृत्यु झाला आहे,‘‘ राष्ट्रसंघाच्या या संस्थेच्या प्रवक्‍त्या कारलोटा सामी यांनी सांगितले.हे स्थलांतरित लीबियामधून इटलीमध्ये येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.