25 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News ग्वाल्हेरजवळ आंध्र प्रेदश एक्स्प्रेसला भीषण आग

ग्वाल्हेरजवळ आंध्र प्रेदश एक्स्प्रेसला भीषण आग

0
20

ग्वालियर,दि.21(वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली. या डब्यांमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. दुपारी एकच्या सुमारास ग्लालियारमधील बिर्लानगर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या आंध्र प्रदेश एसी एक्स्प्रेसला अचानक आग लागली. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अचानक झालेल्या घटनेमुळे रेल्वेतील प्रवासी घाबरून गेले. गाडीला आग लागल्याचे समजताच लोको पायलटने रेल्वे थांबवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.