25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home Top News आल्लापल्ली येथील दोन सख्या भावडांचा नाव उलटल्याने मृत्यू

आल्लापल्ली येथील दोन सख्या भावडांचा नाव उलटल्याने मृत्यू

0
23

आल्लापल्ली(अशोक दुर्गम) दि.५:: आल्लापल्ली येथील रहीवासी असलेले चेतन संतोष केळझरकर (वय २५) व सुरज संतोष केळझरकर (वय १७)या दोन सख्या भावंडाचा अहेरी तालुक्यातील टिकेपल्ली नदी घाटावर नाव उलटल्याने मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारला सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
चेतन संतोष केळझरकरचा आज जन्मदिवस होता या कारणाने मित्रांसोबत टिकेपल्ली येथील नदीघाटावर (पार्टी) करण्याकरिता गेले होते. यात चेतन केळझळकरचा लहान भाऊ सुद्धा गेला होता. दरम्यान मौज मस्तीत नदीमध्ये असलेल्या नावेमध्ये बसुन फिरण्याच्या हेतूने चेतन व त्याच्या भाऊ सुरज नावेवर बसले,नाव काही अंतरावर गेल्यानंतर असंतुलित झाल्याने नाव उलटली व ते बुडाले, यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्यापही त्यांचे मृतदेह सापडलेले नसल्याचे बोलल्या जात आहे. याबाबत अहेरी पोलीस घटनेचा तपास करत आहे.