25.5 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकरी संघटनेचे नेते शरद खेडीकरांचा मृत्यू

आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकरी संघटनेचे नेते शरद खेडीकरांचा मृत्यू

0
27

नागपूर,दि.05– जय जवान जय किसान संघटनेच्या दूध आंदोलनाच्या दरम्यान साेमवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शेतकरी नेते शरद खेडीकर (४५) यांचा मृत्यू झाला. ते संघटनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष होते.साेमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंदोलन सुरू झाल्यावर दूध फेकण्यावरून खेडीकर यांचा पोलिसांशी वादही झाला होता. शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यादरम्यान खेडीकर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेतच त्यांना वाहनातून जवळच्या एकवीरा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वीही खेडीकर यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसान संघटनेने शेतकऱ्यांच्या समर्थनात असंख्य आंदोलने केली आहेत.

blank