29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News पांगोली नदीत दुधाचा टॅंकर पलटल्याने चालकासह टॅंकर बेपत्ता

पांगोली नदीत दुधाचा टॅंकर पलटल्याने चालकासह टॅंकर बेपत्ता

0
23

blank

गोंदिया,दि.18ः- गोंदिया तालुक्यात गेल्या दोनदिवसापासून सतत पावसाने हजेरी लावल्याने पांगोली नदीसह छोट्या मोठया नाल्यांनाही पूर आलेला आहे.त्यातच रावणवाडी- कामठा- पांजरा मार्गावर असलेल्या पांगोली नदीवरील पुलावर सुध्दा या पुरामुळे पाणी चढले होते.त्यातच काल मंगळवारला रात्री 9 वाजेच्या सुमारास गोंदिया कामठा मार्गाने दूधाने भरलेला टॅंकर कामठा मार्ग आमगावकडे जात असताना पुलावरून पाणी वाहत असतानाही टॅंकर चालकाने टॅंकर(एमएच16 सीसी 0392) काढण्याचा प्रयत्न केला.यामध्ये दुधाचा टॅंकर हा नदीपात्रात कोसळला.या घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व आपत्ती निवारण चमू घटनास्थळी दाखल होऊन टॅंकरचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.मात्र अद्यापही टँकर व चालकाचा पत्ता लागलेला नाही.तपासकार्य सुरु आहे.अहमदनगर येथील नवाब गुलाम पटेल यांच्या मालकीचा टॅंकर असून गौतम संतोष पाटील मानिकवाडा,ता.नरखेड जि.नागपूर असे टँकर चालकाचे नाव आहे.

blank