जोधपूरमध्ये एअरफोर्सचे मिग 27 अपघातग्रस्त

0
39

जोधपूर,(वृत्तसंस्था)दि.04 – येथून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या फौजदरा गावाजवळ मंगळवारी सकाळी 9 वाजता एअरफोर्सचे मिग 27 विमानाचा अपघात झाला. मात्र पायलट या अपघातातून बचावले. अपघातानंतर विमान शेतात कोसळले. कोसळताच विमानाला आग लागली. चांगली बाब म्हणजे त्यावेळी शेतात कोणीही काम करत नव्हते.