अर्थसंकल्पीय अधिवेशनात 15 विधेयके मांडणार – मुख्यमंत्री

0
8

मुंबई : सोमवार, दि.9 मार्च, 2015 पासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकंदर 15 विधेयके मांडण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे विरोधीपक्ष नेत्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

विधीमंडळाच्या 9 मार्च, 2015 पासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळातील सदस्य व आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांना सूचना
सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात आमदारांनी नियमित उपस्थित रहावे तसेच संबंधित खात्याच्या सर्व मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्वक उत्तरे द्यावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

या अधिवेशनात मांडण्यात येणारी विधेयके पुढील प्रमाणे-

१. महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषदा (सुधारणा) विधेयक, २०१5 (नगर विकास विभाग- सन २०१४ चा महा. अध्या. १८ याचे रुपांतर) (महानगरपालिका व नगर परिषदांमधील प्रभागातून बहु सदस्य निवडून देण्याची पद्धत रद्द करुन एक सदस्य निवडून देण्याची पद्धत पूर्ववत करणे)
२. महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, २०१५ (गृह विभाग- सन २०१५ चा महा. अध्या. 2 याचे रुपांतर) (जिल्हा स्तरीय आणि विशेषीकृत अभिकरण समिती स्थापन करण्याकरिता तरतुदी)
३. नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजुर अपचलनगर साहिब (सुधारणा) विधेयक, २०१५
(महसूल विभाग-सन २०१५ चा महा. अध्या. ३ याचे रुपांतर) (नांदेड गुरुद्वाराचे मंडळ घटीत करण्यासंबंधातील तरतुदी)
४. महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2015 (सन २०१५ चा महा. अध्या. ४ याचे रुपांतर) (विद्यापीठाच्या प्रकुलगुरुची नियुक्तीच्या कालावधीत वाढ करून तो बारा महिन्यांहून अठरा महिने करणे)
5. महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे जतन व संरक्षण (सुधारणा) विधेयक, २०१5 (महानगर पालिका व नगर परिषदा यांनी वृक्ष प्राधिकरण स्थापन न केल्यास किंवा असे वृक्ष प्राधिकरण काम करू न शकल्यास संबंधित महापालिका आयुक्त किंवा मुख्य अधिकारी अशा प्राधिकरणाचे अधिकार वापरता येतील अशी तरतूद करणे) (नगर विकास विभाग- मंत्रिमंडळ मान्यता दि.५ जानेवारी २०१५)
6. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०१५ (जाने. ते डिसेंबर २०१५ या कालावधीत घेतल्या जाणा-या ग्रामपंचायतींच्या निवड्णुकांच्या संबंधात राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरतेवेळी जात प्रमाणपत्र पडताळणी पत्र सादर करण्याच्या तरतुदींमधून विवक्षित कालावधी करिता सूट देणे) (ग्रामविकास विभाग- मंत्रिमंडळ मान्यता दि. ३ फेब्रुवारी २०१५)
7. महाराष्ट्र लोक-सेवा हमी विधेयक, २०१५ (नागरीकांना देण्यात येणा-या सेवा निश्चित कालावधीत देण्यात येतील याबाबत तरतूद करणे) (सामान्य प्रशासन विभाग)
8. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, २०१५ (रुग्णालयाच्या इमारतींच्या संदर्भात इमारतींची कमाल उंचीची मर्यादा शिथील करुन अशा ४५ मीटरपर्यंत उंचीच्या इमारती बांधता येतील अशी तरतूद करणे) (नगर विकास विभाग)
9. महाराष्ट्र दिवाणी न्यायालये (सुधारणा) विधेयक, २०१५ (राज्यातील दिवाणी न्यायालयांची आर्थिक अधिकारिता पंचवीस लाखावरून एक कोटी व जिल्हा न्यायालयांची अपील अधिकरिता पंचवीस लाखावरून एक कोटी एवढी वाढविणे) (विधि व न्याय विभाग)
10. महाराष्ट्र करविषयक कायदे (सुधारणा) विधेयक, २०१५ (सन २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणांच्या अनुषंगाने करविषयक प्रस्ताव) (वित्त विभाग- वैधानिक कामकाज)
11. महाराष्ट्र पुरवणी (विनियोजन) विधेयक, २०१५ ( सन २०१४-२०१५ या वर्षाकरिता अतिरिक्त पुरवणी मागण्या) (वित्त विभाग- वैधानिक कामकाज)
12. महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०१५ (सन २०१५-१६ या वर्षाकरिता तरतुदी) (वित्त विभाग- वैधानिक कामकाज)
13. महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) विधेयक, २०१५ (सन २०१५-१६ या वर्षाकरिता लेखानुदान) (वित्त विभाग- वैधानिक कामकाज)
14. महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, २०१५ (राज्य शासनाची “मेक इन महाराष्ट्र” योजना कार्यान्वित व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्यात लागू असलेल्या विविध कामगार विषयक अधिनियमांमध्ये सुधारणा) (मंत्रिमंडळ मान्यता अपेक्षित).
1५. महाराष्ट्र उस खरेदी कर (सुधारणा) विधेयक, २०१५( वित्त विभाग) (साखर उद्योगाला २०१४-१५ या वर्षाकरिता उस खरेदी कर प्रदानातून सूट देण्याकरिता तरतुदी)

पटलावर ठेवावयाचे अध्यादेश
१. महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषदा (सुधारणा) अध्यादेश, २०१४ (सन २०१४ चा महा. अध्या. १८) (महानगरपालिका व नगर परिषदांमधील प्रभागातून बहु सदस्य निवडून देण्याची पद्धत रद्द करुन एक सदस्य निवडून देण्याची पद्धत पूर्ववत करणे)
२. महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महा. अध्या. १)
(महाराष्ट्र आकस्मिकता निधीची मर्यादा तात्पुरत्या स्वरुपात वाढवून ती २१५० कोटी रुपये एवढी करणे)
3. महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महा. अध्या. 2) (जिल्हा स्तरीय आणि विशेषीकृत अभिकरण समिती स्थापन करण्याकरिता)
४. नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजुर अपचलनगर साहिब (सुधारणा) अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महा. अध्या. ३) नांदेड गुरुद्वाराचे मंडळ घटीत करण्यासंबंधातील तरतुदी)
5. महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, 2015 (सन २०१५ चा महा. अध्या. ४) (विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुची नियुक्तीच्या कालावधीत वाढ करून तो बारा महिन्यांहून अठरा महिने करणे)