28.3 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home Top News नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

0
38

गडचिरोली,दि.३१: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल(ता.३०)रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील नारानूर येथील येथील पोलिस पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. मोद्दी पकरी गावडे(४०)असे मृत पाटलाचे नाव आहे.नारानूर हे गाव एटापल्लीपासून उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर आहे. काल १५ ते २० सशस्त्र नक्षली नारानूर येथील मोद्दी गावडेच्या घरी गेले. नक्षल्यांनी मोद्दीला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. पोलिस पाटलाच्या हत्येमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.