ब्रम्हपुरी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार रश्मी खानोरकरांवर जिवघेणा हल्ला

0
21

ब्रम्हपुरी,दि.08 : उद्या होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून आपल्यालाच मतदान मिळावे याकरिता उमेदवार विविध प्रलोभन देत आहेत.त्यातच नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार रश्मीताई पेशने-खानोरकर यांच्या गाडीवर आज शनिवारला सायकांळच्या सुमारास काही बोंडगावच्या जवळील उतारावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली.हल्लेखोरांनी टिकास पावड्यांनी खानोरकर यांच्यावर हल्ला करीत गाडी फोडली.यात सुदैवाने ऱश्मी खानोरकर बचावल्या असून राजकीय व्देषातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.त्यातच श्रीमती पेशने-खानोरकर यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध अखिल भारतीय सर्ववर्गिय कलार समाज संघटनेने नोंदविला आहे.

काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रलोभने दाखविण्यास सुरवात केली असून या घटनेने निवडणुक सुरक्षितपणे कशी पार पडेल याबाबत शंका निर्माण झाली आहे. ब्रम्हपुरी नगरपरिषदेतील ३० हजार ८१५ मतदार थेट नगराध्यक्षासह दहा प्रभागातून २० नगरसेवक निवडून देणार आहेत. उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होताच शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला विराम लागला असून उद्या मतदान होणार आहे.