रॉयल्टी मानेकसाची,रेती वाहतूक होतेय मुंडेसराची;प्रशासन झोपेत

0
28
तहसिल व खनिज प्रशासनाची डोळेझाक;रॉयल्टीधारकावर कारवाईची मागणी
गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.०८ः-जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झालेले नसताना तसेच स्टॉकचा जो साठा प्रशासनाने जप्त केला असेल तो लिलाव करतांना वृत्तपत्रात जाहिरनामा देण्यासोबतच रेतीव्यवसायाशी संबधित असलेल्या सर्व व्यवसायिकांना त्याची माहिती दिल्यानंतरच लिलावाची प्रकिया करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत.मात्र जिल्ह्यातील आमगाव तहसिल कार्यालयातंर्गत येत असलेल्या आमगाव-रावणवाडी मार्गावरील(मानेकसा)येथील स्टॉकच्या रेतीचा लिलाव हा स्थानिक जाहिरनामा काढून लिलाव करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.सोबतच त्या लिलाव झालेल्या स्टॉकरेतीकरीता देण्यात आलेल्या गौणखनिज वाहतुक परवान्याच्या गैरवापर होत असल्याचे प्रकरणही आज उघडकीस आले.प्रशासनाने ज्या स्टाॅककरीता लिलाव केलेला होता त्या लिलावधारकावर गुन्हा नोंदविण्याची वास्तविक कारवाई करायला हवी होती,ती वृत्तलिहिपर्यंत झालेली नव्हती.
यासंदर्भात आमगाव येथील तहसिलदार साहेबराव राठोड यांना भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता त्यांनी वृत्तपत्रात लिलावाचा जाहिरनामा न देता ऑक्टोबंर महिन्यात स्थानिक जाहिरनामा प्रकाशित केल्याचे सांगितले.तसेच गौणखनिज वाहतुक परवान्यावर दुसèया घाटावरील रेतीची वाहतुक होत असल्याबद्दलची माहिती नसल्याचे सांगितले.तर गोंदिया ग्रामीणचे तहसिलदार राहुल सारंग यांनी सदर प्रकरणात कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.
सविस्तर असे की,गोंदिया तालुक्यातील बनाथर गावाजवळ असलेल्या मुंडेसरा या मध्यप्रदेशातील रेतीघाटातील रेतीचा साठा हा बनाथर गावाकडील नदीकिनाèयावर करण्यात आलेला आहे.सध्या लिलाव प्रकिया बंद असल्याने आणि स्टॉकलिलाव झालेले नसतानाही मात्र रेतीची खुलेआम वाहतुक करुन ८ ते १० हजार रुपये ट्रिप प्रती टॅक्टरप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.मुंडेसरा येथील घाटावरुन रेतीची वाहतुक करणाèया ट्रक्टर क्रमांक एमएच ३५,जी.६५७३ च्या चालकाकडे आज शनिवार ८ डिसेंबरला सकाळी ६.३० वाजता दिलेली रॉयल्टी(गौण खनिज वाहतुक परवाना)ही महेंद्र खंडेलवाल रा.मानेकसा येथील गट क्रमांक ३७९य१ आराजी १.३० हे.आर.या खासगी गटावर असलेल्या ३१० ब्रास रेतीसाठा वाहतुक परवानगीकरीता दिलेला आहे.याचा कालावधी ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०१८ पर्यंत दाखविण्यात आलेला आहे.जेव्हा की ज्या ठिकाणावरुन या रेतीची वाहतूक केली जात आहे त्याचा परवानाच नसून परवाना असलेल्या रेतीसाठ्याचे अंतर १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर आहे.त्या साठ्यावरील रेतीची वाहतूक परवान्यावर न करता मुंडेसरा येथील रेतीची वाहतुक खुलेआम केली जात असल्याने जिल्हाधिकारी यांनी महेंद्र खंडेलवाल यांना दिलेला परवाना रद्द करुन परवान्याचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापुर्वी गोंदिया तालुक्यातून वाहणाèया वैनगंगा नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खन्नन करीत त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत डांगोर्लेी येथील नदीघाटावरून साडेसात लाखांवरील मुद्देमाल जप्त केला होता. तसेच अवैधसाठा करणाèया लखन बहेलियासह टड्ढॅक्टर चालक व मालकांविरुद्ध रावणवाडी पोलिसांत मंडळ अधिकारी यांनी तक्रार नोंदविली होती.त्याप्रकरणात ट्रक्टरचालक मालकांना अटक करण्यात आली.मात्र मुख्य आरोपी असलेला व्यवसायी लखन बहेलिया हा अद्यापही फरारच असल्याचे रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.बहेलिया फरार असल्याच्या मुद्यावर पोलीसांची तपास यंत्रणाच कुचकामी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. अवैध रेती वाहतूक करणारे व्यवसायिक  हे जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाशी जवळीक साधणारे आहेत.