25.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home Top News ट्रॅक-ऑटोच्या भीषण अपघातात १० ठार

ट्रॅक-ऑटोच्या भीषण अपघातात १० ठार

0
30

चंद्रपूर,दि.09: जिल्ह्यातील कोरपनापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हेटी गावाजवळ भरधाव ट्रॅक आणि ऑटोचा भीषण अपघात होऊन १० जण ठार झाल्य़ाची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये सात महिला, ऑटो ड्राइव्हर व एका बालकाचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की ऑटोतील ९ प्रवासी जागीच ठार झाले. तर, एक जण जखमी झाला. जखमी प्रवाशाला उपचारासाठी कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

blank