लोकसभेत आज काळ्या पैशांवरील विधेयक, काळा पैसा ठेवणा-यांना १० वर्षांची कैद

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – काळ्या पैशांवर अंकुश लावणारे विधेयक केंद्र सरकार शुक्रवारी लोकसभेत सादर करण्याची शक्यता आहे. यात परदेशात काळा पैसा दडवणा-यांविरुद्ध कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात १० वर्षांच्या तुरुंगवासासह इतर दंडात्मक कारवायांच्याही तरतुदी आहेत.
परदेशात मालमत्ता व पैसा दडवणा-यांना या संपत्तीही माहिती देण्यासाठी एक शेवटची संधीही दिली जाणार आहे. कर-दंड भरून दंडात्मक कारवाईपासून बचाव व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. अघोषित परदेशी उत्पन्न व मालमत्ता (नवीन कर आकारणी) विधेयक, २०१५ मध्ये दडवण्यात आलेल्या संपत्ती-पैशांवर ३०० टक्क्यांच्या दराने दंड भरावा लागेल. अर्थ
मंत्रालयातील सूत्रांनुसार, हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातच सादर केले जाऊ शकते. यानंतर आणखी विचारविनिमयासाठी ते संसदीय समितीकडे पाठवले जाऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाने आठवड्याच्या सुरुवातीलाच त्याला मंजुरी दिलेली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या विधेयकाबाबत माहिती दिली होती. केंद्राने याबाबतचे आश्वासन दिले होते. त्यादृष्टीने हे पाऊल महत्वाचे आहे.

गोमूत्र कॅन्सर बरा करू शकते, भाजप खासदाराचा दावा
कॅन्सरचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गोमूत्र फायदेशीर ठरू शकते, असा दावा भाजप खासदार शंकरभाई एन. यांनी राज्यसभेत गुरुवारी केला. गोहत्या बंदीचे समर्थन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करावयाचा असेल तर गायींचे रक्षण केले पाहिजे. गोमूत्रातून कॅन्सर १०० टक्के बरा होता. मी तशी खात्री देतो. मात्र कोणीही हे ऐकण्यास तयार नाही, असे शंकरभाई म्हणाले. गोमूत्र आणि गाईच्या शेणाचे अनेक उपयोग आहेत. कॅन्सरसारखा गंभीर आजार गोमूत्रातून बरा होऊ शकतो.