लघुसंधारणविभागाचा प्रताप,दीडशे किमीच्या अधिकायाला प्रभार

0
8

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमाशकंर वाकोडीकर यांचा पदभार काढून तो नागपूर जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.यु.गिरी यांच्याकडे सोपविण्याचा पत्र १८ मार्च रोजी पुणे येथील लघुसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्यावतीने काढण्यात आला आहे.जिल्हा परिषदेचे विद्यमान कार्यकारी अभियंता वाकोडीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत असल्याचे त्या पत्रात उल्लेख करण्यात आले आहे.विशेष म्हणजे त्यांना रजेवर पाठवताना त्यांच्या प्रभार हा स्थानिक समकक्ष अधिकार्र्र्याकडे सोपवायला हवा होता.त्यासाठी गोंदिया पाटबंधारे विभाग,स्थानिक स्तर लघू पाटबंधारे विभाग,बाघ इटियाडोह विभाग आणि मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता गोंदियात कार्यरत असतांना यां सर्वांना वगळून नागपूर येथील कार्यकारी अभियंत्याला प्रभार सोपविण्यामागचे शासनाचे धोरण स्पष्ट झालेले नाही.वास्तविक स्थानिक अधिकाèयाकडे प्रभार राहिल्यास कामकाजात अडचण निर्माण होत नाही असे असताना फक्त गिरी यांचेच नावाने पत्र काढण्यामागे राजकीय वलय असल्याच बोलले जात आहे.आज जिल्हा परिषदेच्या झालेल्या स्थायी समितीमध्ये जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद अध्यक्ष व प्रशासनाचे सुध्दा लक्ष वेधत स्थानिक अधिकारीकडेच प्रभार का देण्यात आले नाही अशी विचारणा केली.
विशेष म्हणजे एस.यु.गिरी हे या आधी गोंदिया जिल्हा परिषदेत ६ वर्ष लघुपाटबंधारे विभाग आमगाव येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत राहिलेले आहेत.जून २०१३ मध्येच त्यांची नागपूरला बदली झालेली आहे.त्यांच्या कार्यकाळातील कोल्हापुरी बंधारे कसे व कुठे बांधले गेले याचीही चौकशी झाल्यास एक मोठे प्रकरण समोर येऊ शकते अशी परिस्थिती असताना गिरी यांना हा प्रभार मिळावा यासाठी गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यामार्फेत दबाव टाकल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आज सुरू होती.

मंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच आदेश
दरम्यान पुणे येथील लघुसंधारण विभागाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात दूरध्वनीवरून विचारणा करण्यात आली असता मुख्य अभियंता यांचे स्वीय सहाय्यक श्री.लोंढे यांनी जलसंपदा मंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच वाकोडीकरांचा प्रभार काढण्यात आलेला आहे.त्यांच्या इतर तक्रारींची चौकशी सुध्दा करण्यात येणार आहे.परंतु प्रभार दीडशे कीमीच्या अधिकाèयाला का यावर मात्र त्यापातळीचा समकक्ष अधिकारी गोंदियात नसल्यानेच मंत्रीमहोदयानी सुचविल्यानुसार नागपूर जि.प.च्या कार्यकारी अभियंत्याला प्रभार देण्यात आले असले तरी लवकरच त्याठिकाणी पुर्णकालीन कार्यकारी अभियंता देण्यासंबधी कारवाई सुरू झाल्याचे सांगितले.

जि.प.मध्ये प्रभार सोपविण्याचा अधिकार आमचा-जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर
लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उमाशंकर वाकोडीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याठिकाणी नागपूर जि.प.लपा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.यु.गिरी यांची प्रभारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती जिल्हा परिषदेला मान्य नाही.त्यांच्या नियुक्तीच्या विरोधाचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला असून तातडीने तो शासनाला आजच सादर करण्यात आला असून प्रभार देण्याचा सोपविण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेचा असल्याने तो स्थानिक अधिकाèयाकडेच देण्यात येणार असल्याची माहिती जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी बेरार टाईम्सला दिली.

मी वैद्यकीय रजेवर असताना ,सक्तीच्या रजेवर कसा जाणार-वाकोडीकर
मी गेल्या सोमवारपासूनच वैद्यकीय रजेवर असून माझ्यावर सक्तीच्या रजेवर जाण्याचे काढलेले आदेश चुकीचे आहेत.वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती सीईओ यांच्यासह जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांना ठाऊक असतांना मला सक्तीच्या रजेवर कार्यमुक्त करण्याआधी शासनाकडे विचारणा करणे गरजेचे होते,परंतु तसे करण्यात आले नाही.आधीच एखाद्या रजेवर अधिकारी असला तर त्याला दुसèया रजेवर पाठविताच येत नसताना माझ्यावर अन्याय असल्याची माहिती कार्यकारी अभियंता उमाशंकर वाकोडीकर यांनी दिली आहे.