आमगावात रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा,भाजपनेत्यांचा प्रवेश

0
7

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या२२ मार्चला आमगाव येथील बनगाव भागात असलेल्या सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपचे काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याला अतिथी म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख आ.राजेंद्र जैन,माजी आमदार मधुकर कुकडे,नरेश माहेश्वरी,धनजंय दलाल,सुनील फुंडे,रमेश ताराम,गंगाधर परशुरामकर,जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,बबलू कटरे,दुर्गा तिराले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी अनेकांचा सत्कारही केला जाणार आहे.