खा. पटेल म्हणाले, ‘भाजपला बहुजन नेते नकोच

0
17

अखेर जि.प. अध्यक्ष शिवणकरांचा भाजपला दे धक्का…
गोंदिया- भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील मोठे नेते व विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी आजीमाजी सहा जिल्हा परिषद सदस्य व आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत जोरदार धक्का दिला. शिवणकर व त्यांच्या शेकडो कार्यकत्र्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रफुल पटेल यांनी भाजपला बहुजनांची केवळ मते चालतात, पण त्यांना बहुजनातील कोणी नेता झालेले चालत नसल्याची बोचरी टीका केली.
आमगाव येथील बनगाव हायस्कूलच्या पटांगणात पार आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना खा.पटेल यांनी भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजाला आपल्या स्वार्थासाठी वापर करून त्या समाजाकडे दुर्लक्ष करणारा पक्ष ठरला आहे. देशात व राज्यात बहुजनांच्या बळावर सत्ता मिळाल्यानंतर भाजपला आता बहुजन समाजातील नेतृत्वाची गरजच उरली नसून त्यांची ‘गरज सरो आणि वैद्य मरोङ्क ही प्रवृत्ती अनेकवेळा समोर आली आहे. या क्षुद्र नीतीमुळे भाजपमधील बहुजन नेते व कार्यकत्र्यांत मोठ्याप्रमाणात असंतोष उफाळून आल्याचा उल्लेख केला. भाजपच्यापक्ष बांधणीवर बोलताना श्यामराव कापगते-लक्ष्मणराव मानकरांनी पक्षाची बीजे रोवली असली तरी आमगाव ते खामगाव पर्यंत खèया अर्थाने भाजपला पोचविण्यासाठी प्रा.महादेवराव शिवणकर यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले. काँग्रेसच्या बालेकिल्यात भाजपला उभे करण्याचे काम करणाèया प्रा.महादेवराव शिवणकरांनाच संपविण्याची भाषा भाजप नेतृत्व करीत असल्याने कुणाच्याही मनाला ठेच नक्कीच पोचेल, असे सांगत विजय शिवणकरांनी या परिस्थितीत पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केलेली निवड सकारात्मक व विकासात्मक धोरणाला पाठिंबा देणारे असल्याचेही ते म्हणाले.
देशातील सरकार हे शेतकरी व बहुजन विरोधी कपटी सरकार असून आमच्या सरकारच्या काळात अतिवृष्टी व गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत व कर्जमाफीची भूमिका घेतली होती. परंतु, विद्यमान केंद्रातील व राज्यातील सरकारला शेतकèयांकडे साधे ढुंकूनही बघायलाच वेळ नाही. हे सरकार धर्मांधवादी व उद्योगपतींसमोर गुडघे टेकणारे असल्याची टीका केली. देशाचे पंतप्रधान कोणाच्या ‘मन की बातङ्क करतात ठाऊक नाही. परंतु, अंगावर १५ लाखाचा कोट मात्र नक्की घालतात, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी लगावली. गरिबीचे डमरू वाजवीत सत्ता काबीज करणारे आता सत्तासुंदरीपान करून मदमस्त झाले आहेत. आता त्यांना देशातून गरिबी हद्दपार झाल्याचे वाटत आहे. भूमी अधिग्रहण कायद्यात आमच्या सरकारने शेतकèयांच्या हिताचा विचार केला होता. परंतु, भाजप सरकारने व्यापारी व उद्योगपतींचा विचार करीत शेतकèयांच्या मुळावरच उठले आहेत. या कायद्यामुळे शेतकरी सुरक्षित नाही. धानाला ५ हजाराची मागणी करणारे साधे बोनससुद्धा देऊ इच्छित नाही. फसवे आश्वासन व खोट्या घोषणांच्या आधारे सत्तेत आलेल्या भाजपच्या सरकारपासून जनतेने वेळीच सावध व्हावे, असेही पटेल म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना सांगितले की, लोक सत्तेकडे धावतात. परंतु, आम्हाला सत्ता नको, तर सर्वसामान्य नागरिक व शेतकèयांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करणारे सरकार व पक्ष पाहिजे होते. परंतु, भाजपला सत्ता मिळताच सर्वसामान्य शेतकरी व पक्षाचा निःस्वार्थ काम करणारा कार्यकर्ता, नेता नकोसा झाला आहे. त्यामुळेच आम्ही या सत्तेला लाथ मारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व प्रफुल पटेलांच्या नेतृत्वात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. भाजपची सरकार मजूर, शेतकरी व बहुजनांना न्याय देऊ शकत नाही. त्यांचे भूलथापा देऊन लुबाडणूक करणारे सरकार असल्याची टीका शिवणकर यांनी केली. ज्यांनी संपूर्ण आयुष्य पक्षासाठी खर्ची घातले त्यांनाच पक्षाने काही व्यापारी लोकांमुळे वाळीत टाकल्याचा आरोपही केला. राष्ट्रवादीने शेतकरी व मजूर व सर्वसामान्यांसाठी काम केले आहे. सरकारमध्ये असताना हित जोपासल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या काळात धानाला बोनस आणि भाव मिळायचा. आज भाजपच्या काळात हजार रुपयाने धानाचे भाव पडले. तर धानाला बोनस सुद्धा मिळाले नसून हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती व सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्याचे आवाहन केले.
जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विजय शिवणकर यांच्या पक्ष प्रवेशाने नवे पर्व सुरू झाल्याचे सांगत विद्यमान सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका केली. गरिबांसाठी योजना सुरू करण्याऐवजी मागील सरकारच्या सुरू असलेल्या योजना बंद करून त्यांना वंचित ठेवत असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावेळी विजयरावांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकारी,कार्यकत्र्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून नवी विजयाची गुढी उभारल्याचे सांगत आमगावपासून सुरू झालेली ही परिवर्तनाची लाट भविष्यात मोठा आकार घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. पक्ष सत्तेत आल्यावर कमी कालावधीत भाजपतील नेत्यांना सरकारच्या कामगिरीला कंटाळून पक्ष सोडावे लागत आहे. ज्यांनी पक्षाची पाळेमुळे रोवली त्यांच्यातला व्यक्ती पक्ष सोडणे, हा राजकारणातील उलटा प्रवास अधोरेखित करणारा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, आमदार राजेंद्र जैन,भंडारा जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, मधुकर सांभारे,विजय राणे, आमदार प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, केवल बघेले,सविता बघेले, संगीता दोनोडे, सुखराम फुंडे, तुंडीलाल कटरे, पंचम बिसेन, केशवराव भुते, प्रभाकर दोनोडे, रमेश ताराम, सी.के.बिसेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन बबलू कटरे यांनी केले. कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने आमगाव तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

कुठे गेले ओबीसींच्या नावावर राजकारण करणारे
ओबीसींच्या जिवावर राजकारण करून मत मिळविल्यानंतर त्यांना विसरणारे खूप आहेत. ओबीसींच्या नावावर राजकारण करून मागील सरकारवर टीका करणारे हे आता ओबीसींची शिष्यवृत्ती बंद झाली असताना आणि ओबीसींना मिळणारे घरकुलाचे लाभ योजना बंद झाली असताना ते नेते कुठे गेले? याचा विचार करा, असे सांगत फक्त मतांसाठी राजकारण करणाèयांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

आमची मैत्री आणि नातेसंबंध अधिक दृढ
विजयभाऊंच्या वडिलांशी आमचे आजचेच नाही, तर फार जुने संबंध आहेत. राजकारणातील मैदानात आम्ही एकमेकांविरोधात उभे राहिलो, तरी वैयक्तिक संबंधात कधीच कटुता येऊ दिली नाही. प्रा. महादेवराव शिवणकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत काही नाराज कार्यकत्र्यांना राष्ट्रवादीत पाठवून कामाची दिशा ठरवून दिली होती, असेही प्रफुल पटेल म्हणाले.

विजयभाऊ कार्यकर्ता नव्हे नेते आहेत
एका निवडणुकीने कोणाचे भविष्य निर्धारित करता येत नाही. मी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी कट्टीबध्द आहे. मला विकासाच्या कामात सक्षम आणि जनाधार असलेल्या नेत्यांची गरज आहे. विजयभाऊ हे जनतेचे नेते आहेत. त्यांचे आमच्या पक्षात कार्यकर्ता म्हणून नव्हे तर नेता म्हणून स्वागत आहे. त्यांच्यासोबत मिळूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा रोवायचा आहे.

अर्जुनी मोरगावच्या माजी जि.प.सदस्यांसह सरपंचांचा प्रवेश
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंचासह अनेक नेत्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचा प्रफुल पटेल,सुनील तटकरे,विजय शिवणकर,अनिल देशमुख,राजेंद्र जैन, प्रकाश गजभिये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रवेश करणाèयांमध्ये माजी जिल्हा परिषद रतीराम राणे, भाऊराव खोब्रागडे, माजी सरपंच उद्धव मेहेंदळे, कुणबी सेवा संघाचे सचिव कृष्णकांत खोटेले, अनिल शिवणकर, बाकेराव अवराशे, इटियाडोह मच्छीमार संघाचे माजी अध्यक्ष संजीव पाटीदार यांचा समावेश आहे.