मुंबईच्या महापौरांवर लाचखोरीचा आरोप

0
13

मुंबई- मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर या महापालिकेतील कंत्राटदारांकडे कोट्यवधी रुपयांची लाच मागत असल्याची एक ऑडिओ क्लिप पुढे आली आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनीच उघड करून माध्यमांसमोर आणल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संदीप देशपांडे यांनी महापौरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही दाखल केली आहे. शिवसेना-मनसे यांच्यात जवळीक निर्माण होत असल्याच्या बातम्या अलीकडे येत होत्या. मात्र, हे सत्य नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मनसेच्या या क्लिपमुळे आगामी काळात मुंबईत शिवसेना विरूद्ध मनसे अशी संघर्षाची ठिणगी पडणार आहे.
२0१५-२0१६च्या कर वाढविणार्‍या या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठल्यानंतर चारशे कोटींचा वाढीव निधी विकासकामांसाठी राखून ठेवण्यात आला. परंतु जिसकी लाठी उसकी भैस या म्हणीनुसार पालिकेतील बलाढय़ नगरसेवकांच्या प्रभागांकडे या निधीची गंगा वाहिली. खरोखरच या निधीची गरज असलेले प्रभाग मात्र विकासकामांपासून वंचित राहिले. या असमान निधी वाटपाबाबत विरोधी पक्षातच नव्हे तर शिवसेनेच्या गोटातही असंतोष निर्माण झाला.
याबाबत पालिका महासभेत जाब विचारणार्‍या काँग्रेस नगरसेविकांनाच निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. निलंबित नगरसेवकांनी आपल्या दालनात येऊनच माफी मागावी, असं आडमुठीचं धोरण अवलंबत पालिकेच्या सहा महासभांचा महापौरांनी खेळखंडोबा केला
महापौर स्नेहल आंबेकर आणि मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यामध्ये झालेले संभाषण जसे आहे तसे…
हॅलो…हां महापौर बोलणार आहेत (फोन ट्रान्सफर) – महापौरांचे बोलणे सुरू
महापौर : हॅलो जय महाराष्ट्र –
संदीप देशपांडे – हां जय महाराष्ट्र मॅडम बोला,
महापौर – बरं तेच आता मी फायनल करतेय, म्हणून म्हटलं एकदा परत एकदा विचारावं..काय करायचं..आपणहून विचार केलाय सगळ्यांना खूश करायचं…कारण किती सगळा विचार केला तरी ते बाकीकडून येणार ते येणारच..हे करून..हो ना? आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअलही येऊन गेले आहेत..कारण मी आता तुला 2 बोलले होते ना, पक्षासाठी..म आता फायनल बोलते, 3 देते पक्षाला..
संदीप देशपांडे – नको मॅडम, नको..तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या..
महापौर – नाही..बाकीचे सगळे पक्ष तुझ्या भरवशावर राहिलेत ना..इतर. त्यांचे सगळ्यांचे लेटर आलेत
संदीप देशपांडे- त्यांचे सगळ्यांचे लेटर तुम्हाला देतो, तुम्हाला वाटल तसं करा मॅडम.
महापौर – नाय नाय, पण ऐक ना मी काय म्हणते, इतर लोकांचीही लेटर्स आलेली आहेत. पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील, माझ्याशी..
संदीप – आता तुम्ही मामांचं (दिलीप लांडे, मनसे नगरसेवक, कुर्ला ) ऑलरेडी केलाय ना?
महापौर – मामांचं नंतर..ही पण आहे..वैष्णवी सरफरे (मनसे नगरसेविका, भांडूप) आहे. हीच पण मला वाटतं आलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट थ्रू आलेलं आहे वाटतं.तीच तीचं कामककडे आहे. तीच लेटरपण आहे म्हणजे आणि मामांचं आहे. म कसं काय काय करू म?
संदीप देशपांडे – अजून कुणाचे आलेत लेटर डायरेक्ट?
महापौर – लेटर….आता त्यांच्यावर कारवाई करायचं टेन्शन येतं बाबा (हासण्याचा आवाज)
संदीप देशपांडे – आता मी कशाला कारवाई करू , (महापौरांचा हसण्याचा आवाज) लेटर तर सगळ्यांनाच दिलेत ना मॅडम
महापौर – हो लेटर सगळेच.. तसंच झालंय.. तर म काय करू असं?
संदीप देशपांडे – मी तुम्हाला करू मॅडम दोन मिनिटात फोन?
महापौर – हो चालेल..चालेल
दुस-या फोन कॉलचे संभाषण
हॅलो संदीप देशपांडे बोलतोय, मॅडम आहेत का?
दुसरीकडून पुरुषाचा आवाज..हो एक मिनिट हं (फोन ट्रान्सफर होण्याचा आवाज)
महापौर – हॅलो बोला
संदीप देशपांडे – मॅडम, तुम्ही मामांना तीन आणि हिला 6 दिलेत ना, वैष्णवीला?
महापौर – अं..नाही.. 6 नाही दिलेलं.. एक मिनिट हं जरा (महापौरांची दुसरीकडे विचारपूस – सरपरेला किती दिले, मामांना किती आणि सरफरेला किती दिले असं विचारत आहेत. काय गरज नाही ना सांगायची?) थोडा वेळ थांबून—हॅलो.. सरफरेला दोन आहेत.