छत्तीसगड: नक्षली हल्ल्यात एक जवान शहीद

0
16

वृत्तसंस्था
कांकेर – छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील पखंजूर येथे आज (सोमवार) सकाळी सहाच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तळावर केलेल्या हल्लायत एक जवान शहीद झाला आहे. तर, जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादीही ठार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पखंजूर भागात आज सकाळी बीएसएफच्या तळावर नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. बीएसएफ तळाजवळ तीन कमी तीव्रतेचे बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. नक्षलवाद्यांचा परिसरात शोध सुरू आहे.

नक्षलवाद्यांनी रविवारी कांकेर जिल्ह्यात अनेक गाड्या पेटवून दिल्या होत्या. खाणीसाठी वापरण्यात येण्याऱ्या सर्व गाड्या पेटविण्यात आल्या होत्या. मात्र, यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. शनिवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात सात पोलिस कर्मचारी शहिद झाले होते.