बांद्रा निवडणुक- राणेंना हरविणार शिवसेना?

0
12

मुंबई- शनिवारी पार पडलेल्या बांद्रा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्याकडून हार स्वीकारावी लागेल असे निष्कर्ष एक्झिट पोलमधून आले आहेत. एबीपी माझा आणि नेल्सन ने घेतलेल्या या पोलमध्ये राणेंसाठी हा निकाल चिंतेचा विषय असू शकतो असे संकेत दिले गेले आहेत. मतदानानंतर लगोलग हा पोल घेण्यात आला होता. प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल बुधवारी लागणार आहे.

या पोलमधील निष्कर्षानुसार सावंत यांना राणेंपेक्षा ४ टक्के अधिक मते मिळतील. तृप्ती सावंत या शिवसेनेच्या उमेदवार असून त्यांचे पती बाळा सावंत येथून आमदार होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाल्याने तेथे पोटनिवडणक घेतली गेली. या मतदारसंघातून रिंगणात असलेल्या एमआयएमच्या रेहबर सिराज खान यांना २२ टक्के मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे तर अन्य व अपक्षांना ६ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.