25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News महावितरणच्या अभियंत्याचे महिला कर्मचाऱ्याशी कार्यालयातच चाळे छायाचित्र व्हायरल

महावितरणच्या अभियंत्याचे महिला कर्मचाऱ्याशी कार्यालयातच चाळे छायाचित्र व्हायरल

0
31

गोंदिया,दि.20 : आजघडीला अत्यावश्यक सेवेत विजेचा देखील समावेश होतो. पूर्वी महामंडळ असलेल्या मराविविम चे शासनाने कंपनीत रुपांतर केले. त्यामुळे या विभागावरचा भार अधिकच वाढला. एकीकडे वरिष्ठ स्तरावरून उत्कृष्ट सेवा पुरविण्याचे निर्देश आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्याकरिता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर दबाव. एकीकडे विद्युत पुरवठा खंडीत असला तरी चालतो. मात्र वसुलीची थकबाकी असू नये, असा फतवाच काढण्यात आला आहे. परिणामी कर्तव्यनिष्ठ कर्मचारी रात्रीचा दिवस करत अहोरात्र मेहनत घेतात. असे असताना मात्र काही अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे चापलुसी करत आपल्या पोळ्या शेकतात. कार्यालयात बसून अधिनस्त कर्मचाऱ्यांची अश्लील चाळे करतात. असाच प्रकार गोंदिया शहरातील एका महावितरणच्या कार्यालयात असलेला अधिकारी अधिनस्त महिला कर्मचाऱ्याशी चाळे करतानाचा छायाचित्र आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या छायाचित्र आणि व्हिडीओमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयीन स्तरावर वरिष्ठ अधिकारी त्या अभियंता आणि अधिनस्त महिला कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संवंधित चाळे करणारा अभियंता स्वत:ला कवी म्हणून देखील मिरवितो. त्यासंबंधात संबंधीत अभियंत्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सोशल मिडीयावर देखील संबंधित छायाचित्र व्हायरल झाले असून आता त्यावर उलट सूलट कमेंट करण्यात येत आहेत. त्या महिला कर्मचाऱ्याचे स्थांतर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.