जांभूळखेडा घटनेचा सुत्रधार नक्षल्यांचा डीव्हिसीएम दिनकर गोटास पत्नीसह अटक

१८ लाखांचे ईनाम,१०८ गंभीर गुन्हे दाखल,३३ खुनाचे गुन्हे

0
182

गडचिरोली,दि.4ः नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीचा तसेच कोरची दलमच्या डिव्हीसीएम पदावर
कार्यरत असलेला दिनकर गोटा व त्याची दुुुुसरी पत्नी सुनंदा कोरेटी यांना आज बुधवारला(दि.4) गोपनिय
माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने पहाटे गडचिरोली पोलीस
स्टेशनच्या हद्दीतुन अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.सुनंदा ही कोरची दलमच्या सदस्य पदावर कार्यरत होती.

कुरखेडा तालुक्यातील मौजा दादापूर येथे नक्षलींनी ३६ वाहने जाळली होती. यानंतर १ मे २०१९ रोजी नक्षल्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवुन आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान व १ खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. या घटनेच्या मुख्य सुत्रधारापैकी एक असलेला व त्यावेळी नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीचा तसेच कोरची दलमच्या डिव्हीसीएम पदावर कार्यरत असलेला दिनकर गोटा यास व कोरची दलमच्या सदस्य पदावर कार्यरत असलेली महिला नक्षली सुनंदा कोरेटीला ताब्यात घेणअयात आले.पोलीस अधिक्षक बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षली दिनकर गोटा हा सन- २००५ मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. यानंतर सन- २००६ मध्ये चातगाव दलम, सन- २००७ मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी मेंबर, सन-२००८ मध्ये धानोरा दलममध्ये कमांडरपदी कार्यरत, सन- २०११ मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी सचिव, सन- २०१६ पासुन कोरची दलममध्ये उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या विभागीय समिती सदस्य पदावर तो कार्यरत होता. एकुणच गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात त्याची पकड होती. दिनकर गोटा याचेवर गडचिरोली पोलीस दलातील विविध पोस्टे, उपपोस्टे व पोमके येथे एकुण १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात ३३ खूनांचा समावेश आहे. त्याचबरोबर सन-२००९ साली मरकेगाव चकमकीत त्याचा सहभाग होता. मौजा दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व दिनांक ०१ मे २०१९ रोजी मौजा जांभूळखेडा येथे भूसुरूंग स्फोट घडविण्यात तो मुख्य सुत्रधार होता.

जाांभूरखेडा व दादापूर घटनेची रेकी व प्लॅनिंगमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकुण १६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. तर नक्षली सुनंदा कोरेटी ही सन- २००९ मध्ये नक्षल दलममध्ये  भरती झाली. सध्या ती नक्षलवाद्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिचेवर एकुण ३८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिचेवर एकुण ०२ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

२८ फेब्रुवारी २०२० रोजी पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्या समोर उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत असलेला विलास कोल्हा याने एके-४७ शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते.तर चातगाव दलम कमांडरसह संपुर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले होते. जांभुळखेडा घटनेतील ८ आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने यापुर्वीच अटक केलेली असुन घटनेचा संपुर्ण तपास करुन तपास एनआयए कडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलीस दलाने नक्षलींच्या उत्तर गडचिरोली डिव्हीजनचा विभागीय समितीचा सदस्य असलेला आणि दादापुर,जांभुळखेडा घटनेचा कट रचण्यात व कटाची अंमलबजावणी करण्यात प्रमुख भुमिका बजावलेल्या कुख्यात नक्षली दिनकर गोटा यास अटक केल्याने उत्तर गडचिरोली भागात नक्षलवाद्यांना जबर धक्का देण्यात गडचिरोली पोलीस दलाने यश मिळविले आहे.

नक्षली दिनकर गोटा व सुनंदा कोरेटी हीला मौजा दादापूर येथील वाहन जाळपोळ प्रकरणी पुराडा पोलीस स्टेशन येथे दाखल गु.रं.न. २०/२०१९ कलम ४३५, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, १२० ब) भादवि, सहकलम ५/२८ भाहका,१३५ मपोका, १६,१८,२०,२३ युएपीए कायद्यानुसार दाखल गुन्हयात अटक करुन आज न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १४ दिवसांची प्राााथमिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनकर गोटा हा सन- २०१९ माहे सप्टेंबर मध्ये एका नक्षल महिलेसह दलम मधून निघुन गेल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाली होती. यानंतर सातत्याने गडचिरोली पोलीस दल त्याच्या मागावर होते. अखेर पोलीस दलाच्या अखंड प्रयत्नांना यश येवुन जहाल नक्षली दिनकर गोटा व सुनंदा कोरेटी यांना जेरबंद करण्यात यश प्राप्त झाले. दिनकरच्या अटकेमुळे दिनांक ०१ मे २०१९ रोजी जांभूळखेडा घटनेतील शहीद जवानांना न्याय मिळाल्याची भावना पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली.
त्यांनी नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे. त्याचबरोबर गडचिरोली पोलीस दल नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच दिनकर गोटा यास अटक करणाऱ्या विशेष पोलीस तपास पथकाचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले असुन,या संपुर्ण विशेष पोलीस पथकास पारितोषिक जाहिर केले आहे.