भंडारा,दि.16 : भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या गराडा येथील रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने भंडारा जिल्हा करोना मुक्त झाला होता.मात्र स्थलातंराच्या प्रकियेत पुण्यावरुन भंडारा येथे आपल्या खासगी वाहनाने आलेल्या दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने पुन्हा भंडारा जिल्हा आॅरेंज झोन मध्ये गेला आहे.त्या दोघांना भंडारा जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याबरोबरच इन्स्टिट्यूशन क्वारटांईन करण्यात आले होते.दरम्यान त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते,ते आज(दि.16) पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे जिल्हाप्रशासन अधिक सतर्क झाले असून स्थलातंरणामुळे भविष्यात अनेक जिल्ह्यात अशाप्रकारे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





