अर्जुनीत सायकल दुकानाला आग

0
15

वादळासह पावसाने झोडपलेः विज पुरवठा सुद्धा खंडित

अर्जुनी मोरगाव,दि08- काल रात्री आठच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह झालेल्या वादळी पावसात शहरातील एका सायकल दुकानाला आग लागून दुकान मालकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. दरम्यान वादळी पावसाने अर्जूनी पसरात चांगलेच झोडपल्याचे वृत्त आहे.

गेल्या 4-5 दिवसापासून विजेच्या कडकडासह वादळी पाऊस  हजेरी लावत आहे. काल झालेल्या पावसादरम्यान अर्जुनी शहरातील राजेश सायकल स्टोर्सला आग लागून संपूर्ण दुकान खाक झाले आहे. या घटनेचा तपास अर्जुनी मोरगाव पोलिस करीत असून नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेणे सुरु आहे. या घटनेत झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी व्यवसायिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या अस्मानी संकटाने अनेकांच्या घरावरचे छप्पर उडाले आहेत.  वादळामुळे अनेक झाड़े तुटून विद्युत तारावर पडल्याने मध्यरात्रीपर्यन्त विद्युत सेवा खंडित राहिली. पोलिस निरीक्षक महादेव तोदले व सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत भुते यांनी पोलिस दलासह मध्य रात्री पर्यन्त स्थिति नियंत्रणात  आणण्यासाठी प्रयत्न केले.