देवरी,दि.१२- येत्या शैक्षणिक वर्षात वर्ग १ली मध्या दाखल पात्र मुलांसाठी पूर्व तयारी म्हणून केंद्रस्तरावर येणाऱ्या २२ सुलभकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण आज (दि.१२) देवरी येथे पार पडले.
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या साने गुरूजी सभागृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे हे होते.यावेळी उपस्थित सुलभकांना देवरीच्या गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक धनवंत कावळे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यात गटसाधन केंद्राचे संजय मस्के आणि विजय लोखे यांनी मारगदर्शन करून सहकार्य केले.