देशाच्या विकासाकरिता युवा सक्षमीकरण आवश्यक आहे :- प्राचार्य डाॅ. ईश्वर मोहुर्ले

0
4

 शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात युवा सशक्तीकरणावर कार्यशाळा )
अर्जुनी/मोर.:— स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग, गुणवत्ता हमी कक्ष आणि मार्गेन कन्सलटन्सी प्रा. लिमीटेड ठाणे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याथ्र्यांकरिता घेण्यात आलेली कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डाॅ. ईश्वर मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली युवा सशक्तीकरण कार्यशाळा संपन्न झाली प्रस्तुत कार्यशाळेला मुंबई ठाणे येथील मार्गेन कन्सलटन्सी प्रा. लिमीटेड चे संचालक गुणाकर अन्वयेकर, समीर देसाई, उल्हास आल्लेवार, श्रद्धा साळवी, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डाॅ. के.जे.सिबी. विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डाॅ. भारत राठोड, कार्यक्रम अधिकारी डाॅ. मोतीलाल दर्वे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व तिन्ही शाखेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्व. शिवप्रसादजी जायस्वाल यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश आणि भुमिका समन्वयक डाॅ. के.जे.सिबी यांनी प्रास्ताविकेतून स्पष्ट केले.
ग्रामीण महाविद्यालयात पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांनी पदवी बरोबरच वर्तमान कष्टाची गरज लक्षात घेवून कौशल्य विकसीत होणारे लहान लहान प्रमाणपत्र कोर्सेस केली तर आपण निर्माण झालेल्या स्पर्धेत आपला टिकाव लागू शकेल असे मौलिक मार्गदर्षन मार्गेन कन्सलटन्सी चे संचालक समीर देसाई यांनी केला.
वैयक्तीक व व्यवसायाच्यावाढीसाठी कोणत्याही क्षेत्रात कौषल्य विकसीत करण्याचे आणि संपादीत करण्याची आवष्यकता मार्गेन कन्सलटन्सीचे संचालक गुणाकर आलेकर यांनी प्रतिपादन केले. महाविद्यालयात षिक्षण घेणारा केवळ अभ्यास क्रमावर केंद्र न देता वर्तमान काळाची पावले ओळखून विद्यार्थीनी कौषल्य विकसीत करुन आपली बलस्थाने गुणांना ओळखून करीअरचे मार्ग निवडावे असे मौलिक मार्गदर्षन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.ईष्वर मोहूर्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाशणातून केले.
कार्यक्रमाचे संचालन डाॅ. भारत राठोड यांनी केले तर उपस्थिातांचे आभार डाॅ. मोतीलाल दर्वे यांनी केले. कार्यक्रमांच्या यषस्वीतेकरीता डाॅ. भारत राठोड, डाॅ. मोतीलाल दर्वे, प्रा. स्वाती मडावी, प्रा. चंद्रषेखर राखडे, षुभम काळसर्पे, दर्षन बेहार, विवेक नाकाडे, केषव मीरी, समिर राऊत, वैभव चनाप, अतूल जनबंधू तेजस रामटेके इत्यांदीनी परीश्रम घेतले