पोलिस पाटील पदभरती अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध असेल – वरुणकुमार शहारे

0
9

अर्जुनी मोर. :–( सुरेंद्रकुमार ठवरे ) नुकत्याच आरक्षण सोडत झालेल्या पोलिस पाटील पदांच्या अर्ज सादर करण्याच्या तारिख व भरती प्रक्रियेबाबत वेगवेगळ्या चर्चा अर्जुनी मोरगाव उपविभातील गावांगावामध्ये सुरू आहेत. यावर विश्वास न ठेवता उपविभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार येत्या काही दिवसांत जाहिरामा प्रसिद्ध केल्यानंतर पदभरतीचा कार्यक्रम जाहीर करून पारदर्शक आणि शिस्तबद्धपणे राबविली जाईल असे मत उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस पाटील पदे रिक्त असता कामा नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उपविभाग गोंदिया तिरोडा देवरी व अर्जुनी मोरगाव यांच्या अधिनस्त पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२३ पत्राद्वारे निर्देश दिले होते.
त्यानुसार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात बिंदू नामावली मंजूर करून आरक्षणानुसार पदसंख्या व पदभरतीच्या अनुषंगाने आरक्षण काढण्यात आले. अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनीतील एकूण ९५ पदाकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली त्यातील जवळपास २५ गावातून काढलेल्या आरक्षणावर हरकत घेण्यात आली आहे. अजून पर्यन्त जाहिरामा प्रसिद्ध करण्यात आला नसला तरी उमेदवारांमध्ये अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात संभ्रम पसरविला जात होता. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या पोलीस पाटील पद भरती कालबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये पोलीस पाटील पदाकरिता अर्ज करण्याच्या आणि अखेरच्या तारखेबाबत सोशल मीडिया अनेक अफवा पसरवण्यात आल्या त्यानुसार आज निवड समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी वरणकुमार शहाणे यांच्याशी चर्चा केली असता अजून पर्यंत पोलीस पाटील पदाकरिता काही तांत्रिक बाबीमुळे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.लवकरच जाहीरनामा काढण्यात येईल त्यानंतरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल नागरिकांनी आणि उमेदवारांनी कुठल्याही भूलथापा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. अनेक वर्षांपासून अर्जुनी मोरगाव उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गावांमध्ये जवळपास ६० टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त असल्यामुळे गावागावात पोलीस पाटील पदाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता भरली आहे. उपविभागीय कार्यालयाच्या ४० ते ५० कि.मी. पर्यंत दूर असणाऱ्या गावातील उमेदवारांना ऑफलाइन अर्ज प्रक्रिया असल्यास कार्यालयात ये – जा करावी लागेल त्या अनुषंगाने यात अधिक पारदर्शकता असावी आणि उमेदवाराणा त्रास होऊ नये या हेतूने जाहीरनामा निघाल्यानंतर पोलीस पाटील पदाबाबत अर्ज करण्याची प्रक्रिया ही संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीची असेल असेही उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी सांगितले.

‘‘ २१ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या आरक्षण सोडत सभेमध्ये जवळपास २५ गावातील नागरिकांनी निघालेल्या आरक्षणावर हरकत घेतली. अनेक नागरिक अमुक जातीचा आपल्या गावात माणूसच नाही त्याचा आरक्षण कसं निघालं? याबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत्या त्यावर, उपविभागीय कार्यालयाच्या वतीने सुरुवातीला जाहीरनामा प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहे, ठरलेल्या आरक्षणाचा उमेदवार त्या गावात उपलब्ध न झाल्यास किंवा ज्या ठिकाणाहून अर्ज येणार नाहीत. त्या ठिकाणी पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण दिनांक १६ ऑक्टोबर २००८ च्या शासन निर्णयानुसार नव्याने आरक्षण ठरवून पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया एकत्र राबवली जाणार आहे.