आमदार रवींद्र वायकर यांच्यासह पत्नीवर गुन्हा दाखल

0
6

मुंबई:-शिवसेनेचे दोन्ही गट एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालपासून सुरू झाली.या सुनावणीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे पाहयाला मिळत आहे.जोगेश्वरी येथील भूखंड आणि हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी रवींद्र वायकर , त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार असून आमदार वायकर यांनी जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबचा गैरवापर तसेत तिथे हॉटेल बांधताना माहिती लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यांसंबंधीचे आरोप केले होते. त्यानंतर आमदार रवींद्र वायकर यांच्या हॉटेलचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केल्यानंतर मुंबई महानगरपालिके त्या बांधकामाची परवानगी नाकारत कामाला स्थगिती दिली.त्यानंतर वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली पण त्यांना दिलासा मिळाला नाही.

दरम्यान आता वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून लवकरच या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे.