शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव येथे पीएम स्किल रन मॅरेथानचे आयोजन

0
14

गोंदिया, दि.19 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव येथे 17 सप्टेंबरला पीएम स्किल रन मॅरेथान व दिक्षांत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रम उत्स्फुर्त प्रतिसाद आणि उत्साहात पार पडले.

         पीएम स्किल रन मॅरेथान स्पर्धेस नायब तहसिलदार श्री. नागपुरे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सुमारे 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

        त्यानंतर लगेच राष्ट्रीय प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते बबलु पटले आणि उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कटरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. मात्रे हे होते. प्रत्येक व्यवसाय निहाय गुणवत्ताप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्प निदेशक जयंत काटकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिल्प निदेशक ललित पुंजे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम रंगारी, श्रीमती पोटे, श्रीमती रिनाईत, तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.