जिल्हा परिषदेचा दुजाभाव क्षुल्लक कामेही रोखली : महिला सदस्याचे अन्नत्याग आंदोलन सुरू

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया.- ज्यामुळे परिसरातील नागरिकांचे जीव जात आहेत. ती कामे तातडीने करावयाची असल्यास कसलीही हरकत नाही, अशी कामे देखील जिल्हा परिषदेने अडवून ठेवली. स्मरणपत्र आणि अल्टिमेटम देवून देखील ती कामे झाली नाही. अखेर कंटाळून जिल्हा परिषद सदस्य विमल बबलू कटरे या महिला जिप सदस्याने महिला पंचायत समिती सदस्यासह जिल्हापरिषदेसमोर आज(ता. 19)पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
सालेकसा तालुका नक्षलग्रस्त, मागासलेला आणि आदिवासीबहूल आहे. या तालुक्यासाठी शासन अमाप पैसा मंजूर करतो. मात्र, तो पैसे केवळ कागदोपत्रीच खर्च होतो, अशी ओरड आहे. त्यातच जिल्हा परिषदेचा सत्तापक्ष देखील आता पक्षपाती धोरण अवलंबत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे यांनी उपस्थित केला. त्यांच्या तिरखेडी क्षेत्रात येणाऱ्या साखरीटोला ते तिरखेडी या रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाले. या रस्त्याच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी अनेक आंदोलने झाली. किमान खड्डे भरण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेने कार्यारंभ आदेश द्यावा. धानोली ते बाम्हणी रस्ता बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने वर्षभरापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र देवून देखील रस्ता बांधकाम झाले नाही. त्या रस्ता बांधकामाला निधी वाढवून द्यावा. जप मध्ये वैयक्तिक आणि विकासात्मक कामांना हेतूपुरस्सर प्रलंबित ठेवली जातात. त्या कामांची जबाबदारी निश्चित करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेला विमल कटरे यांनी दिले होते. 18 सप्टेंबरपर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास 19 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र जिपने त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने अखेर आज, 19 सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर विमल कटरे आणि पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाला बबलू कटरे, सरपंच उर्मिला कटरे, उपसरपंच शामू मेश्रम, रेखा सयाम, होमेंद्र कटरे, अभय कुरंजेकर, विजय कटरे, झामसिंग कटरे, भाऊलाल दिहारी, नरेश बघेले, गजानन मेश्राम, प्रल्हाद दिहारी, गोरेलाल बिसेन, मूलचंद सयाम, द्वारकाप्रसाद बघेले, संतोष बघेले, गवरचंद कटरे, शामा दिहारी, जीतेंद्र भोई, गुलाब फुलबांधे, राजीव ठकरेले, पंकज चौधरी, नीलम हलमारे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.