गोरेगाव – गोरेगाव तालुका तील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे १५ ऑक्टोबरला माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी म्हणून तंन्टामुक्ती गांव समिती चे अध्यक्ष लिखीराम बघेले, सामाजिक कार्यकर्ता कमलेश पटेल, बंबई केंन्द्राचे केंद्र प्रमुख ए के वंजारी, मोहाडी पोलीस पाटिल राजेश येळे, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय डी चौरागडे, सदस्य जे जे पटले, हिरालाल महाजन, सुभाष चौरागडे,माजी सरपंच धुर्वराज पटले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी ग्रंथालयात अभ्यास करून गावातील पाच विद्यार्थी भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यात प्रविण मुकेश येरखडे, धर्मेश शामलाल पटले,हर्ष पन्नालाल भोयर,प्रतिक चंन्द्रशेखर बघेले व मोहाडी पोलीस पाटिल पदी निवड झालेले राजेश रूपचंद येळे यांचे सत्कार ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी सांगितले की भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी अंत्यत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत रामेश्वर मधील एका नावाड्याच्या मुलाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक संरक्षण सिध्दतेसाठी सक्षम केले.राष्ट्रपती पदापर्यंत झेप घेतली शाळा महाविद्यालये विद्यापीठात जाऊन व्याख्यांनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनांवर समर्थ भारताच्या स्वप्नानाचे बीजारोपण केले.आज अशा महान व्यक्तीमत्व असणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय डी चौरागडे सर संचालन संस्थेचे सदस्य वाय एफ पटले सर, आभार प्रदर्शन जे जे पटले सर यांनी..