( तावसी खुर्द येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन थाटात साजरा )
अर्जुनी मोर.- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे महान पुजारी होते. तथागत बुध्दाने संपुर्ण जगाला शांतीप्रिय धम्म दिला.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचा बुध्दराष्ट जगाला पटवून दिला.व भारताला संविधानाचे रुपाने अनमोल लोकशाही दिली. जग किंवा माणूस दुसऱ्यांचे विनासासाठी उभा ठाकतो. तेव्हा बुद्ध आठवतो व सर्व जग म्हणतो “युद्ध नको बुद्ध हवा “या चार शब्दात मानवाचे कल्याण दडलेले आहे.अशा या महान बुध्द धम्माच्या झोळीत डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला टाकुन बौध्द धम्माची दिक्षा दिली. सोबतच 22 प्रतिज्ञा व त्रिशरण पंचशील तत्वे दिली.त्याचे आचरण प्रत्येकाने करुन बुध्द धम्माची ज्योत सदैव तेवत ठेवा असे आवाहन सरपंच मिनाबाई शहारे यांनी केले.
प्रज्ञा बौध्द विहार व नागसेन बुध्दविहार तावसी खुर्द येथे आयोजीत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणुन त्या बोलत होत्या.
सर्वप्रथम दोन्ही विहारात भगवान बुद्ध व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतीमांना माल्यार्पण करुन मेणबत्ती प्रज्वलित करुन सरपंच मिनाबाई शहारे यांचे हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सामुहिक बुध्द वंदना व पंचशील ग्रहण करण्यात आले. दोन दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणुन माजी सरपंच दिलीप शहारे, ग्रा.पं.सदस्य विशाखा शहारे, महेश कुंभरे, सामाजिक कार्यकर्ते संजय बडोले,नागसेन बुध्द विहार अध्यक्ष शेंडे सर,प्रज्ञा बुध्द विहार अध्यक्ष मदन जांभुळकर,लोपचंद जांभुळकर, घनश्याम शहारे, नेताजी शहारे, ढवळेजी, बालविर शहारे, सागर जांभुळकर, शालु जांभुळकर, कविता शहारे, अमित जांभुळकर,नम्रता टेंभुर्णे, माधुरी बडोले, रेखा धाकडे,व शेकडो उपासक, उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.दोन दिवस विविध सामाजिक उपक्रमशिल कार्यक्रम राबविण्यात आले. तथा ग्रामवासियांना अल्पोपहार देण्यात आले.संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन व मार्गदर्शन माजी सरपंच दिलीप शहारे यांनी केले.