प्रत्येक गावात प्लॉस्टीक कच-याचे वर्गिकरण करा- नूतन सावंत

0
4
????????????????????????????????????

चंद्रपुर,25/10/2023-प्लॉस्टीकच्या वस्तुंचा वाढता वापर , व यामुळे गावा गावात नजरेने दिसणारे प्लॉस्टीक  यामुळे प्लॉस्टिक कच-याची समस्या गावस्तरावर निर्माण होते. प्रत्येक गावातील प्लॉस्टिक निर्मुलन करण्यासाठी, प्रत्येक गावात प्लॉस्टिक वर्गिकरण करणे गरजेचे असुन,ग्रामस्थांनी गावस्तरावर प्लॉस्टिक कच-याचे वर्गिकरण करावे. असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी केले आहे.

        प्रत्येक क्षेत्रात प्लॉस्टीकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असुन, प्लॉस्टिकचा कमीत कमी वापर होणे गरजेचे आहे.वापरात येणारे प्लॉस्टिक यामुळे मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक कच-याची समस्या निर्माण होत असुन, यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे . प्लॉस्टिक निर्मुलनासाठी गावस्तरावर ग्रामस्थांनी जागृत होण्याची वेळ आलेली आहे.  भविष्यातील प्लॉस्टिक कच-यापासुन निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्लॉस्टीक पिशव्यांचा वापरासह इतरही प्लॉस्टिकच्या वस्तुंचा वापर करणे जास्तीत जास्त वेळा टाळण्याची सवय अंगवळणी लावण्याची गरज झाली आहे. प्लॉस्टीक पिशवीच्या जागी कापडी पिशवीचा वापर होणे व याबाबत ग्रामस्थांनी जागृत व्हावे लागणार आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील गावांमध्ये प्लॉस्टिक कचरा संकलनासाठी गावक-यांनी चांगली शकल लढवली असुन, कोरपना तालुक्यातील कुकुडसात गावात दररोज कचरा संकलनाचे काम चालु असुन. प्लॉस्टीक कच-याचे वर्गिकरण रोज करता यावे, यासाठी ग्रामस्थांनी गावातील चौकात लोखडी जाळीचे केज तयार करुन ठेवण्यात आले . यामुळ  या गावात प्लॉस्टीकचा कचरा नियमित गोळा होत असुन, त्याच वेळी प्लॉस्टीक कच-याचे दररोज ग्रामस्थांकडुन वर्गिकरण केल्या जात आहे. गावात गोळा होणारा सर्व प्लॉस्टीक कचरा अंबुजा सिमेंट कंपणीत पाठविल्या जात आहे. यामुळे यागावात प्लॉस्टीक कच-याचे निर्मुलन होण्यास मदत झाली आहे. या गावात केलेल्या प्लॉस्टीक संकलन व वर्गिकरणाचा प्रयोग चांगला असुन,चंद्रपुर जिल्ह्याल सर्व गावात प्लॉस्टीक कच-याचे नियमित संकलन व वर्गिकरण करावे.  असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता नूतन सावंत यांनी केले आहे.