NRHM कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पुकारला संप,आरोग्य सेवा विस्कळीत

0
17

गोंदिया,दि.25- राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शासनाकडून प्रतिसाद नसल्याने शेवटी स्थायी करण्याच्या मागणीसाठी आज २५ ऑक्टोंबरपासून गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला.इतर भागातील कंत्राटी डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालयांतील रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे.

आंदोलकांच्या माहितीनुसार, ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले आहे. महाराष्ट्रातही या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु, काहीही केले जात नाही. त्यामुळे १६ ऑक्टोंबरला नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले होते. त्यात मोठ्या संख्येने कंत्राटी अधिकारी- कर्मचारी सहभागी झाल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील आरोग्य सेव कोलमडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले. यावेळी मागणी मान्य न झाल्यास २५ ऑक्टोंबरपासून संपाचा इशाराही दिला होता. परंतू शासनाकडून प्रतिसाद नसल्याने शेवटी आज बुधवारी गोंदिया येथील कंत्राटी डॉक्टर ते चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर गेले आहे. त्यामुळे येथील रुग्णांच्या विविध सेवेबाबत अडचणी वाढणार आहेत.या आंदोलनात संजय बिसेन,अमित मंडल,संकेत मोटघरे,डॅा.मिना वट्टी,अविनाश वर्हाडे,कु.योगिता अडसड,बी.एस.बोपचे,दिनेश माखिजा,इंजि.राजू येळे,डाॅ.पकंज पटले,बबिता रहागंडाले,संतोष बोरकर,अनिल रहमतकर आदींचा आंदोलनात सहभाग होता.