वनहक्क जमिनीचे प्रस्ताव त्वरीत मार्गी लावा :- माजी मंत्री राजकुमार बडोले

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

= उपविभागीय अधिकारी यांना Answer सादर
*अर्जुनी मोर. :-* अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील अनेक लाभारथ्यांचे वनहक्क जमिनीचे प्रस्ताव धुळखात पडले असुन सदर वनहक्क जमिनीचे प्रस्ताव त्वरीत मार्गी लावा अशा आशयाचे निवेदन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोर. चे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांना दिले आहे.
अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल आहे. मागील दहा ते पंधरा वर्षापासुन वन जमीनीवरील अतिक्रमण धारक शेतकरी बांधवांचे वनहक्क समीती मार्फत सादर केलेले प्रस्ताव प्रलंबित असुन त्यावर कार्यवाही होवुन निकाली काढण्यात यावे.तसेच अनेक प्रकरणे गहाळ सुध्दा झालेली आहेत.त्या गहाळ प्रकरणांचा त्वरीत शोध घेवुन ते सुध्दा निकाली काढण्यात यावे. अशा विवीध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांना देवुन याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी सडक/अर्जुनी तालुका भाजपा अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, पंचायत समिती उपसभापती शालींदर कापगते, पंचायत समिती सदस्य चेतन वळगाये, तथा वनहक्क पट्टे न मिळालेले शेतकरी गोवर्धन परशुरामकर, सुभाष सोनवाने, भोजराम सोनवाने, दौलत राऊत, राजाराम सोनवाने, गोपीचंद नेवारे, भुमेश्वर मोहणकर, यादवराव लांजेवार, रामजी कापगते, मोहण गावराने, व्यंकट येवले, नुतनलाल अंबुले, मयाराम ठाकरे, दोडकु मोहणकर, ईश्वर कोरे, पिरमबापु राऊत, मनराज गहाणे, व अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.