साकोलीच्या मुख्याधिकार्‍यांना निलंबित करा

पत्रपरिषदेत नगराध्यक्षांची मागणी

0
1746

साकोली,दि.13ःनगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या नियमबाह्य व अरेरावीच्या कृतीला साकोलीवासी कंटाळले असून, त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नगराध्यक्षांना समाजकंटक असे अपमानजनक शब्दप्रयोग केला. त्या साकोली नगर परिषदेत रुजू झाल्यापासून केलेल्या कारवाईची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रपरिषदेतून करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी मडावी या नगर परिषद अधिनियम व नियम यातील तरतुदींना शासकीय आदेशाला अनुसरून कार्य न करता आर्थिक अनियमितता व आर्थिक गैरप्रकार करतात. तसेच नगराध्यक्ष व नगसेवक यांची बदनामी करून नगर परिषद कारभारात अडथळा निर्माण करतात. शासनाच्या आदेशानुसार मद्यविक्रीच्या दुकानावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे अधिकार हे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असताना याबाबत नगर परिषदेचा कोणताही ठराव नसताना रॉयल बार अँन्ड रेस्टॉरेंट या बारसंदर्भात नियमाबाह्य व बेकायदेशिर कारवाई केल्यामुळे संबंधित व्यक्तीने न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी मुख्याधिकारी यांना नगर परिषदेचा कोणत्याही प्रकारचा ठराव व नगराध्यक्षांच्या परवानगीशिवाय कार्य करून नगर परिषदेचे ४0 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. नगराध्यक्ष असताना एखाद्या प्रकरणाची माहिती हवी असल्यास किंवा संबंधित प्रकारणाची फाईल मागितली असता देत नाही. त्यांच्या अधिनस्त कर्मचार्‍यांना माहिती देण्यास मनाई करतात. नगरपरिषदेतर्फे खरेदी केलेल्या अग्नीशमन वाहनाची आरटीओ नोंदणी करण्यापूर्वी सदर वाहन नगरपरिषदेला देणे बंधनकारक होते. मात्र, तसे न करता या वाहनाचा ताबा न घेताच वाहन नोंदणी करून घेतल्यामुळे नगरपरिषद अडचणीत आलेली आहे. सदर वाहन नगरपरिषदेला उपलब्ध होऊ शकले नाही. याला सर्वस्वी जबाबदार मुख्याधिकारी मडावी आहेत. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मुख्याधिकारी यांना हजर राहणे बंधनकारक असताना दि. ३ जून रोजी झालेल्या सभेत अनुपस्थित होत्या. पटाच्या मैदानावर टाकण्यात आलेल्या मुरमाची रॉयल्टी किंवा संबंधित अधिकार्‍याची लेखी परवानगी नाही. स्थायी समितीच्या ठरावाशिवाय मुरमाची नियमबाह्य वाहतूक करण्यात आली. कोरोना काळात शासनाच्या विरोधात अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन शुल्क घेणे, असे प्रकार घडले आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात ओळखपत्र देणे, दुकानदारांना दुकान उघडण्यासाठी लागणार्‍या परवानगीचे नियमबाह्य शुल्क आकारणी केली आहे. स्वर्मजीने नियमबाह्यरित्या निविदा उघडणे, जनता कफ्यरू संदर्भात नगरपरिषदेला विश्‍वासात न घेणे, दक्षता समितीची स्थापना करताना न. प. ला विश्‍वासात न घेणे, कर्मचार्‍यांवर दबाव आणून त्रास देणे असे अनेक प्रकार मुख्याधिकारी करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पत्रपरिषदेला नगराध्यक्षा धनवंता राऊत, नगरसेवक अँड. दिलीप कातोरे, हेमंत भारद्वाज, गटनेता अनिता पोगडे, शहर अध्यक्ष किशोर पोगडे उपस्थित होते.