गोंदिया,दि.24 गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 24 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या अहवालानुसार नव्याने आणखी 85 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.उपचार घेत असलेल्या 120 बाधितांनी कोरोनावर मात केली.गोंदिया येथील 83 वर्षीय रुग्णाचा गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.
आज नवीन 85 कोरोना बाधित रुग्ण आढळले. ती रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -43, गोरेगाव तालुका -04,आमगाव तालुका-09, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका- 11, सडक/अर्जुनी तालुका -04, अर्जुनी/मोरगाव तालुका -10 आणि इतर राज्य/बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आतापर्यंतचे आढळलेले बाधित रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -5298, तिरोडा तालुका -1124, गोरेगाव तालका- 380,आमगाव तालुका -638, सालेकसा तालुका -384, देवरी तालुका-437, सडक/अर्जुनी तालुका-393,अर्जुनी/मोरगाव तालुका-470 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 105 रुग्ण आहे.असे एकूण 9229 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.
उपचार घेत असलेल्या 120 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय ती रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका – 64, गोरेगाव तालुका -01, आमगाव तालुका -10, देवरी तालुका -04, सडक/अर्जुनी तालुका – 32 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-09 असा आहे.कोरोनावर आतापर्यंत 8118 रूग्णांनी मात केली आहे.
क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -549,तिरोडा तालुका-74,गोरेगाव तालुका- 29, आमगाव तालुका -81,सालेकसा तालुका -18, देवरी तालुका-83, सडक/अर्जुनी तालुका- 39,अर्जुनी/मोरगाव तालुका-105 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 15 असे एकूण 993 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 86.61 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.24 टक्के आहे.तर डब्लिंग रेट हा 73.09 टक्के आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील 117 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-70, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका -6, सालेकसा तालुका-2,देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.
विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 36906 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 28000 नमुने निगेटिव्ह आले. तर 5794 नमुने पॉझिटिव्ह आले.तर 75 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
गृह विलगिकरणात 174 आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 33070 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 29705 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3365 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 10 चमू आणि 8 सुपरवायझर जिल्ह्यातील 8 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी कार्यरत आहे. गोंदिया तालुका -01, सडक/अर्जुनी तालुका -01, तिरोडा तालुका -06 असे कंटेंटमेंट झोन आहे.
भंडारा जिल्ह्यात आज 72 रुग्णांना डिस्चार्ज
• 87 कोरोना पॉझिटिव्ह
• बरे झालेले रुग्ण 6664
• पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 7964
• क्रियाशील रुग्ण 1099
• आज 02 मृत्यू
• एकूण मृत्यू 201
• रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.67 टक्के