बोंडगाव देवी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

0
96

अर्जुनी मोर. :- तालुक्यातील बोंडगाव देवी येथे बौध्द समाजाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 64 वा वर्धापनदिन अत्यंत साध्या पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
आनंद बुध्द विहार, मिलिंद बुध्द विहार तथा मातोश्री रमाई आंबेडकर चौकात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंदिया जि.प.माजी अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर ठवरे होते.अतिथी म्हणून भाग्यवान फुल्लुके,अमर ठवरे, कुंडलिक भैसारे,धन्नु वालदे,मयाराम रामटेके, समाजाचे अध्यक्ष अशोक रामटेके, सचीव संतोष टेंभुर्णे, गणेश वालदे,पृथ्वीराज मेश्राम, जितेंद्र मेश्राम, भीमराव लोणारे,सुखदास रामटेके, व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम आनंद बुध्द विहार येथे तथागत गौतम बुद्ध, व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना माल्यार्पण व मेनबत्ती प्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.व सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली. यानंतर रमाई चौकात मातोश्री रमाई आंबेडकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण व मेनबत्ती प्रज्वलीत करुन बुध्द वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप मिलींद बुध्द विहारात घेण्यात आला. भगवान बुद्ध यांचे मुर्ती ला पुष्प अर्पुन मेनबत्ती प्रज्वलीत करण्यात आली. सामुहिक बुध्दवंदनेनंतर बोंडगाव देवी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर हुमणे यांचे कडुन अल्पोपहार तर भाग्यवान फुल्लुके यांचे कडुन बुंदीचे लाडू समाज बांधवांना वाटण्यात आले.यावेळी चंद्रशेखर ठवरे यांनी समाजबांधवाना थोडक्यात बुध्दाच्या पालीभाषेतील गाथांचा अर्थ समजावून सांगितला. व बुध्दवाणीने मानवात बदल कसा होता. हे सुध्दा सांगितले. बुध्द वंदना जितेंद्र मेश्राम, एकनाथ रामटेके, यांनी म्हटली.संचालन प्रविण ठवरे,संतोष टेंभुर्णे, तर आभार अशोक रामटेके यांनी केले.