हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.निमगडे यांचा कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार

0
372

नागपूर,दि.27: नागपूर विभागाचे नव्याने रुजू झालेले आरोग्य सेवा हिवताप/हत्तीरोग सह्याक संचालक डाॅ.श्याम निमगडे यांचा उपसंचालक, माता कचेरी कार्यालयात राज्य हिवताप /हत्तीरोग कर्मचारी संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे नागपूर, गोंदिया,चंद्रपूर, भंडारा,वर्धा, गडचिरोली, येथील जिल्हा अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सेवा नागपूर येथील  सहायक संचालक हिवताप हे पद बर्याच दिवसापासून रिक्त होते.त्या पदावर गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे यांची बदली झाल्याने ते पद भरण्यात आले आहे.गोंदिया,चंद्रपूर गडचिरोली , हे हिवताप व किटकजन्य आजाराकरिता सवेंदनशिल जिल्हे आहेत.त्यातच छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यातून नागरिकांचे स्थलांतरण होत असल्यानेही आरोग्य सेवेवर ताण पडतो.त्यातच अनेक जिल्ह्यात प्रभारी जिल्हा हिवताप/हत्तीरोग अधिकारी असल्यानेही त्यावर नियोजन करण्यात अडचणी निर्माण होतात.त्या आता काही प्रमाणात आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्मचारी/अधिकारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता सर्व प्रयत्न करण्याचे आश्वासन डाॅ.निमगडे यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले. डाॅ.श्याम निंमगडे यांना बाजीराव कांबडे कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष यांनी भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.तर कार्यक्रमाचे संचालन व नियोजन नंदकिशोर भालेराव गोंदिया यांनी तर आभार विभागीय अध्यक्ष निरंजन चिकटे नागपूर यांनी मानले.